शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Rajasthan Assembly Election: भाजपामधून बाहेर पडलेल्या हनुमानाची वेगळी वाट; तिसऱ्या आघाडीच्या हालचाली जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 07:22 IST

भाजपामधून बाहेर पडलेले नेतेच भाजपासाठी अडचणीचे ठरत आहेत

जयपूर: अपक्ष आमदार हनुमान बेनीवाल यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी असं या पक्षाचं नाव आहे. जयपूरमध्ये 10 किलोमीटर लांब रोड शो केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्षाची घोषणा केली. विशेष म्हणजे हनुमान बेनीवाल हे आधी भाजपामध्ये होते. मात्र मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर ते पक्षातून बाहेर पडले. हनुमान बेनीवाल यांनी जयपूरमध्ये हुंकार रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीचा समारोप झाल्यावर त्यांनी भाषण केलं आणि स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. यावेळी व्यासपीठावर भारत वाहिनी पार्टीचे अध्यक्ष घनश्याम तिवारी उपस्थित होते. तिवारीदेखील आधी भाजपामध्ये होते. मात्र त्यांनीदेखील वसुंधराराजे यांच्या राजकारणाला कंटाळून भाजपाला रामराम केला. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीच्या स्थापनेवेळी राष्ट्रीय लोकदलाचे उपाध्यक्ष जयंत चौधरी आणि समाजवादी पक्षाचे नेते संजय लाठरदेखील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना बेनीवाल यांनी समविचारी पक्षांसोबत विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला. यामधून त्यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले. राजस्थानात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. सध्या राज्यातील दोन प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेसनं उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. या पक्षांमधील असंतुष्टांना गळाला लावण्याचा प्रयत्न इतरांकडून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हनुमान बेनीवाल हे जाट समाजाचे नेते आहेत. राज्यात जाट समाजाचं प्रमाण 12 टक्के आहे. राजस्थानात विधानसभेच्या 200 जागा आहेत. यातील 70 जागांवर जाटांची मतं निर्णायक ठरु शकतात. त्यामुळे बेनीवाल आणि तिसरी आघाडी भाजपासह काँग्रेससाठी डोकेदुखी ठरु शकते.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस