शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:11 IST

 “संघाला कधीही सत्तेची इच्छा नाही. हिंदू समाज संघटित करून भारतमातेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न संघ करतो."

भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू सभ्यतेशी जोडली गेली आहे आणि तिचे पूर्वज हिंदूच आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते शनिवारी आरएसएसच्या एका कार्यक्रमात बोलत होते. 

भागवत म्हणाले,  “संघाला कधीही सत्तेची इच्छा नाही. हिंदू समाज संघटित करून भारतमातेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न संघ करतो. जेव्हा संघ म्हणून एकत्रितपणे जोर लावला जातो, तेव्हा त्याचा उद्देश काही राजकीय फायदा घेणे नसतो तर भारत मातेच्या सेवेसाठी समाजाला एकतेच्या सूत्रात बांधने असतो. कधीकाळी लोकांना संघाच्या हेतूवर शंका होती, मात्र आता तेही संघाचे कार्य आणि उद्दिष्ट समजू लागले आहेत." या यावेळी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित होते.

भागवत पुढे म्हणाले, “इंग्रजांनी आपले राष्ट्र बनवले नाही. भारत प्राचीन काळापासूनच एक राष्ट्र आहे. प्रत्येक देशाची आपली संस्कृती असते आणि भारताची संस्कृती 'हिंदू' आहे. आपण स्वतःला काहीही म्हटले तरी आपली ओळख हिंदूच आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन असले तरी आपण सर्वजण एकाच सभ्यतेतून निर्माण झालो आहोत आणि आपले पूर्वज एकच आहेत.

भागवत म्हणाले, “भारतामध्ये कुणीही अहिंदू नाही. आपण हिंदू आहोत, हे सर्वांना माहीत असायला हवे, कारण, याचा अर्थच भारतासाठी जबाबदार नागरिक असा आहे." या शिवाय, "भारत हिंदू राष्ट्र आहे आणि संविधानही याला विरोध करत नाही. सनातन धर्म आणि भारत यांना वेगळे केले जाऊ शकत नाही. सनातन धर्माची प्रगती म्हणजेच भारताची प्रगती,” असेही भागवत म्हणाले.
 

English
हिंदी सारांश
Web Title : All Indians, including Muslims, Christians, are descendants of Hindu ancestors: Bhagwat

Web Summary : RSS chief Mohan Bhagwat stated everyone in India is Hindu, linked to Hindu civilization. He emphasized unity for India's service, not political gain. Bhagwat asserted India is inherently Hindu, a nation since ancient times, and all share common ancestors.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदूMuslimमुस्लीम