शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंची आयोगाकडून कानउघाडणी

By admin | Updated: October 21, 2014 03:08 IST

माझ्या हाती सत्ता दिली तर राज्यात उपलब्ध होणारी प्रत्येक नोकरी फक्त महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींनाच दिली जाईल.

नवी दिल्ली : माझ्या हाती सत्ता दिली तर राज्यात उपलब्ध होणारी प्रत्येक नोकरी फक्त महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींनाच दिली जाईल. एवढेच नव्हे तर परराज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना रेल्वे स्थानकांवरच अडवून परत पाठविले जाईल, असे भाषण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केल्याबद्दल निवडणूक आयोगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली आहे.राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकास देशात कुठेही जाण्याचा, स्थायिक होण्याचा व नोकरीधंदा करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे असे धोरण राबविण्याच्या आश्वासनांवर निवडणुकीत मते मागणे हा केवळ आचारसंहितेचाच भंग नाही तर ती मुलभूत हक्कांचीही पायमल्ली आहे, असा समज आयोगाने दिला.घाटकोपर आणि कालिना येथे अनुक्रमे ५ आणि ७ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या प्रचारसभांमध्ये राज ठाकरे यांनी अशा प्रकारची विधाने केली होती. त्यावरून विनोद तिवारी यांनी तक्रार केल्यानंतर आयोगाने ठाकरे यांना नोटीस काढली होती. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराचा विचार करून आयोगाने त्यांचे कान उपटले.मराठी माणसाचे हित जपणे हा माझ्या पक्षाचा मुख्य अ‍ॅजेंडा आहे. त्यामुळे त्यानुसार धोरणे आखणे व सत्तेत आल्यास ती राबविण्याची ग्वाही देण्याने मुळात कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होत नाही व राजकीय पक्षाने ध्येयधोरणांच्या प्रचारात आचारसंहितेचा भंग होत नाही, अशी भूमिका राज यांनी उत्तरात घेतली, परंतु ती अमान्य करून निवडणुकीत पक्षीय राजकारण करतानाही राज्यघटनेचे भान ठेवायला हवे, याची जाणीव राज ठाकरे यांना करून दिली.आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल आयोग तुमची तीव्र निंदा करीत आहे व भविष्याच जाहीर वक्तव्ये करताना सांभाळून बोलावे, अशी तुम्हाला समज देत आहे, असे आयोगाने दिलेल्या निकालत नमूद केले गेले आहे. (विशेष प्रतिनिधी)