शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

Toolkit: संबित पात्रा यांना टूलकिटप्रकरणी नोटीस; हजर राहण्याचे पोलिसांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 3:05 PM

Toolkit: भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना नोटीस बजावून हजर राहण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसंबित पात्रा यांना टूलकिटप्रकरणी नोटीसहजर राहण्याचे रायपूर पोलिसांचे निर्देशमाजी मुख्यमंत्र्यांचा जबाब नोंदवणार!

रायपूर: काही दिवसांपासून काँग्रेस टूलकिटवरून राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. भाजपकडून काँग्रेसवर टीका केली जात असून, काँग्रेसकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. ट्विटरनेही याप्रकरणी भाष्य केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना नोटीस बजावून हजर राहण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. (raipur police sent notice to bjp sambit patra over toolkit issue)

अलीकडेच भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस टूलकिटचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. यावेळी संबित पात्रा यांनी काँग्रेसवर मोठे आरोप केले. यावरून संबित पात्रा यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यांनी छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी संबित पात्रा यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असून, हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

माजी मुख्यमंत्र्यांचा जबाब नोंदवणार!

रायपूर पोलिसांनी टूलकिटप्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांना जबाब नोंदवण्यासाठी २४ मे रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपकडून करण्यात आलेले आरोप काँग्रेसने फेटाळून लावले असून, संबित पात्रा आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.  

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनावरून सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसची एक कथिट टूलकिट दाखवली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अयोग्य शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणायचे आहे. कुंभ मेळ्याला सुपर स्प्रेडरप्रमाणे सांगायचे आहे. परंतु ईदला काहीच म्हणायचं नाही, असे पात्रा यांनी कथित टूलकिट दाखवताना म्हटले. 

टॅग्स :Toolkit Controversyटूलकिट वादSambit Patraसंबित पात्राBJPभाजपाChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिसcongressकाँग्रेसPoliticsराजकारण