raipur minor climbed high tension pole due to alcohol afte not giving bike | बापरे! बाईक दिली नाही म्हणून 'तो' 100 फूट उंच विजेच्या खांबावर चढला अन्..

बापरे! बाईक दिली नाही म्हणून 'तो' 100 फूट उंच विजेच्या खांबावर चढला अन्..

रायपूर - देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान काही धक्कादायक घटनाही समोर येत आहेत. अशीच एक घटना छत्तीसगडच्या रायपूरमध्ये घडली आहे. घरच्यांनी बाईक दिली नाही म्हणून एका 16 वर्षीय मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. बाईक न दिल्याने तो संतापाच्या भरात विजेच्या खांबावर चढला आणि जवळपास 100 फूटावरून खाली पडल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरमध्ये 16 वर्षीय मुलगा दारूच्या नशेत विजेच्या खांबावर चढला. त्याला गेल्या काही दिवसांपासून बाईक हवी होती. मात्र कुटुंबीयांनी बाईक घेण्यास नकार दिल्याने त्याने असा टोकाचा निर्णय घेतला. विजेच्या खांबावरील विद्युत तारांमुळे त्याला शॉक बसला आणि यामुळे तो तब्बल 100 फूट अंतरावरून खाली पडला. 

उंच खांबावरून खाली पडल्याने मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बाईकच्या हट्टापायी त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. रायपूरच्या गुडियारी परिसरात ही घटना घडली. 

16 वर्षीय मुलगा नशेत विजेच्या खांबावर चढून कुटुंबाला धमकी देत होता. यावेळी जमलेल्या लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. कुटुंबीयांसह पोलिसांनीही मुलाला समजावून सांगितले. मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. याच दरम्यान विजेचा धक्का लागून तो खाली पडला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Corona Vacine : 20 वर्षांपासूनच्या शोधाची कमाल; रशियाकडून SputnikV वेबसाईट लाँच

भयंकर! धावत्या बसने अचानक घेतला पेट; 5 जणांचा होरपळून मृत्यू, 27 जण जखमी

"ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र

"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी

बंगळुरू पेटलं! शहरात कलम 144 लागू; पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी 110 जणांना अटक

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: raipur minor climbed high tension pole due to alcohol afte not giving bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.