शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेत पावसाचा कहर, नेपाळच्या पावसामुळे गंगेला आले रौद्र रूप; एका दिवसांत २८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 11:47 IST

हरयाणात धरण फुटले; पंजाबमध्ये अख्खे कुटुंब वाहून गेले; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: रविवारी उत्तर आणि वायव्य भारतात मुसळधार पावसाने किमान २८ लोकांचा मृत्यू झाला. यात दरडी कोसळणे, वाहतूक कोंडी आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या. हरयाणात धरण फुटल्याने अनेक गावे जलमय झाली. दिल्ली, पंजाब, बिहार, राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली असून, वाहने पाण्यात अडकली आहेत. दिल्लीतील रोहिणी पार्कमध्ये पाण्यात बुडून ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. नेपाळच्या तराई भागातील पावसामुळे बिहारच्या पूरस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्याचा स्तर वाढल्याने अनेक ठिकाणी लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

बिहारच्या पाटणा, भागलपूरसह अन्य जिल्ह्यांत गंगा, कोसी व अन्य नद्यांची पाणी पातळी सतत वाढत असून, नद्यांचे रौद्र रूप पाहून लोकांची धाकधूक वाढत आहे. मुसळधार पाऊस आणि मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर धरणातून पाणी सोडल्यामुळे गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

लग्नाला निघाले होते, नदीत कार घातली अन् घात झाला

होशियारपूर : पंजाबच्या होशियारपूरपासून सुमारे ३४ किमी अंतरावर असलेल्या जैजों येथे पूर आलेली नदी पार करताना वाहन वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला असून, १ जण बेपत्ता झाला. पंजाब आणि इतर भागात मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. हे कुटुंब हिमाचल प्रदेशातील मेहरोवाल येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असतानाच ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करून या वाहनातील एकाची सुटका केल्याने तो वाचला आहे. नदीतून दोन महिलांसह सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता झालेल्या तिघांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरRainपाऊसriverनदी