ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 20:12 IST2025-09-30T20:12:08+5:302025-09-30T20:12:24+5:30
IMD Weather Alert: सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील मराठवाड्यासह इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती
सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील मराठवाड्यासह इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य संकटात सापडले आहेत, अशा परिस्थितीत आता भारतीय हवामान खात्याने आणखी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा ११५ टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर या पावसामुळे गेल्या ५० वर्षांतील रेकॉर्ड तुटू शकतो. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात एवढा पाऊस पडत नाही.
सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंवण्यात आला आहे. आता ऑक्टोबर महिन्यात देशातील गेल्या ५० वर्षांच्या इतिहासातील पावसाचा रेकॉर्ड टुटू शकतो. भारतात सप्टेंबर महिन्यात मान्सूनची तिव्रता कमी होते. मात्र यावेळी मान्सून अधिक सक्रिय राहिला. तसेच अजुनही काही भागात आर्द्रता आहे. त्या आर्द्रतेमुळे ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेही महापात्रा यांनी सांगितले.
दरम्यान, या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रकरणात नुकसान होऊ शकतो. ऑक्टोबर महिना हा पिकांच्या कापणीचा हंगाम असतो. अशा वेळी पाऊस पडला तर पिकांचं नुकसान होतं. तसेच या पावसामुळे भात, मका, सोयाबीन या पिकांचं खूप नुकसान होऊ शकतं. याशिवाय शेतामध्ये पाणी साचल्यानेही पिके कुजण्याची शक्यता आहे. .