शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला जाहिरातींतून १० हजार कोटींचा लाभ शक्य

By admin | Updated: December 23, 2014 00:37 IST

आर्थिकदृष्ट्या चणचणीत असलेली भारतीय रेल्वे प्रवासी गाड्यांचे डबे, मालगाड्यांच्या वाघिणी, रेल्वेस्थानके आणि तिकिटांमागील कोरी

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या चणचणीत असलेली भारतीय रेल्वे प्रवासी गाड्यांचे डबे, मालगाड्यांच्या वाघिणी, रेल्वेस्थानके आणि तिकिटांमागील कोरी जागा अग्रगण्य ब्रॅण्डच्या उत्पादनांना जाहिरातींसाठी उपलब्ध करून देऊन वर्षाला १० हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकते, असा अहवाल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना अलीकडेच सादर करण्यात आला आहे.रेल्वेमंत्री झाल्यावर लगेच प्रभू यांनी रेल्वे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जाहिरातींच्या जागेच्या विक्रीतून किती महसूल मिळवू शकते याचा प्रथमच व्यावसायिक तत्त्वांवर आढावा घेण्याचे काम रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘राईट््स’ या अभियांत्रिकी सल्ला व सेवा संस्थेकडे सोपविले होते. ‘राईट््स’ने त्यांचा अहवाल अलीकडेच मंत्र्यांना दिला आहे.रेल्वेच्या प्रवासी व मालगाड्या देशभर सर्वत्र फिरत असल्या तरी त्यांची संभाव्य उत्पन्नाच्या दृष्टीने वर्गवारी करून महसुलाचा हा अंदाज काढण्यात आला आहे. त्यानुसार ‘राजधानी’ व ‘शताब्दी’ यासारख्या ‘प्रीमियम’ गाड्यांवरील जाहिरातींसाठी अन्य मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत जाहिरातींसाठी वाढीव दर आकारता येतील, असे सुचविले गेले आहे. तसेच वाघिणींवरील जाहिरातींचा प्रेक्षकवर्ग आणखी वेगळ््या वर्गातील असल्याने त्यांच्यासाठीही वेगळे दर लावण्याची कल्पना आहे. या अहवालानुसार देशभर धावणाऱ्या २६ राजधानी, २० शताब्दी व ३२ दुरान्तो गाड्यांच्या डब्यांवरील जागा जाहिरातींसाठी विकून रेल्वेला वर्षाला ७८० कोटी रुपये मिळू शकतात. या गाड्यांवरील जाहिराती या गाड्यांमधून प्रवास करणारे दोन लाख प्रवासी तर हमखास पाहतीलच. शिवाय या गाड्यांच्या प्रवासात आणखी ४० लाख लोकांचे लक्ष या जाहिरातींकडे वेधले जाईल, हे लक्षात घेऊन या गाड्यांच्या जाहिरातींचे ‘ब्रँडिंग’ केले जावे, असे अहवालात सुचविण्यात आले आहे.रेल्वे प्रशासन सध्याही जाहिरातीतून उत्पन्न मिळवत असले तरी त्यासंबंधीचे कोणतेही एकात्मिक असे धोरण नाही. रेल्वेच्या दृष्टीने वाघिणी हा जाहिरातींच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत ठरू शकतो अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्यंतरी केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)