रेलवे प्रवासादरम्यान लूट : आरोपी अटेकत
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:11+5:302015-02-14T23:52:11+5:30
पुणे : रेल्वेतून प्रवास करत असताना सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असलेली ७७ हजार ५०० रुपयांची हँडबॅग लुटणार्या दोघांना लोहमार्ग शाखेच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.

रेलवे प्रवासादरम्यान लूट : आरोपी अटेकत
प णे : रेल्वेतून प्रवास करत असताना सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असलेली ७७ हजार ५०० रुपयांची हँडबॅग लुटणार्या दोघांना लोहमार्ग शाखेच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. सलीम ऊर्फ कांचा सत्तार शेख (वय ३२) आणि चंद्रकांत गोरख सकट (वय २५, दोघेही रा. गांधीनगर झोपडपी, देहूरोड) अशी आरोपींची नावे आहेत. खान हे २९ जानेवारीला मुंबई-शिर्डी फास्ट पॅसेंजर गाडीच्या बोगी क्र. एस. १ मधून प्रवास करत होते, त्यावेळी ते झोपले असता आरोपींनी त्यांच्या झोपेचा फायदा घेत उशीजवळ ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली हँडबॅग चोरून नेली.