शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

Bonus For Railway Employee : रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी 'दिवाळी भेट', ७८ दिवसांचा पगार 'बोनस' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 16:01 IST

Bonus For Railway Employee : साडे अकरा लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

देशात मंदीचं वातावरण असताना, त्यावर तोडगा काढण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवनव्या घोषणा करत असताना, केंद्रीय मंत्रिमंडळाने आज रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. या घोषणेमुळे त्यांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे.

देशातील ११ लाख ५२ हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून ७८ दिवसांचं वेतन देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गेली सलग सहा वर्षं रेल्वे कर्मचाऱ्यांना विक्रमी बोनस दिला जात आहे. तोच सिलसिला कायम ठेवत यंदाही त्यांना ७८ दिवसांचं वेतन बोनस म्हणून दिलं जाईल, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केलं. याचा फायदा जवळपास साडे अकरा लाख कर्मचाऱ्यांना होईल. या बोनसवर रेल्वेचे २०२४ कोटी रुपये खर्च होणार आहेत.  मोदी सरकारनं ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. शाळकरी विद्यार्थी ई-सिगारेटच्या आहारी जात आहेत. त्यामुळेच ई-सिगारेटचा वापर, विक्री, उत्पादन, साठवणूक या सर्व बाबींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. ई-सिगारेटपेक्षा जास्त हानीकारक असलेल्या सिगारेटवर बंदी घालण्याचं पाऊल का उचलण्यात आलं नाही, असा प्रश्न पत्रकारांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना विचारला. त्यावर ई-सिगारेटची अनेकांना आताच लागली आहे. त्यामुळे तरुण पिढी या व्यसनाच्या आहारी जाण्याआधीच त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेत असल्याचं जावडेकर म्हणाले.  ई-सिगारेटसोबतच ई-हुक्क्यावरदेखील बंदी आणण्यात आली आहे. या प्रकरणी पहिल्यांदा दोषी आढळल्यास १ वर्षांची शिक्षा किंवा १ लाखाचा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. यानंतर दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास ५ लाखांपर्यंतचा दंड किंवा ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेEmployeeकर्मचारी