शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी राजकारणातील पप्पू- साक्षी महाराज

By admin | Updated: October 9, 2016 22:23 IST

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या साक्षी महाराज यांनी आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत

उत्तर प्रदेश, दि. 9 - वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या साक्षी महाराज यांनी आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींना मी हिंदू मानत नाही. ते राजकारणातील पप्पू आहेत, अशी वादग्रस्त टीका साक्षी महाराज यांनी राहुल गांधींवर केली आहे. मैनपुरी जिल्ह्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेला भाजप नेता मैदान सिंह राजपूत याची साक्षी महाराज यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना राहुल गांधींच्या मुद्द्यावर छेडले असता, त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज म्हणाले, राहुल गांधी हे राजकारणातील पप्पू आहेत. ते उगाचच उत्तर प्रदेशचा दौरा करत आहेत. त्यांना राजकारणात पारंगत होण्यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. मी राहुल गांधींना हिंदू मानत नाही. जर ते हिंदूच नाही तर त्यांचे भारत आणि भारतीय सैनिकांवर कसे प्रेम असणार, असेही ते म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांनंतर भव्य राममंदिर उभारू, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

वादग्रस्त वक्तव्य आणि साक्षी महाराज हे जणू समीकरणच झालं आहे. दोन वर्षांपूर्वी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी गांधी हत्या करणारा नथुराम गोडसे आपला आदर्श असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय स्तरातून टीका होऊ लागल्यानं पक्षानं त्यांना नोटीस बजावली होती. मात्र त्यावेळी त्यांनी मी असं वक्तव्य केला नसल्याचा घूमजाव केला होता.