शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

महिला अत्याचाराविरोधात सरकारनं कडक पावलं उचलावीत- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 12:06 AM

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कठुआ आणि उन्नाव बलात्कार घटनांच्या निषेधार्थ इंडिया गेटजवळ कँडल मार्च काढला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्यरात्री कठुआ-उन्नाव बलात्कार घटनांच्या निषेधार्थ इंडिया गेटजवळ कँडल मार्च काढला. राहुल गांधींच्या या कँडल मार्चमध्ये अशोक गेहलोत, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद आणि दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद, नफीसा सोनी सारखे काँग्रेसचे दिग्गज नेतेही सहभागी झालेत. मानसिंग रोडपासून इंडिया गेटपर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. तसेच प्रियंका गांधी वढेरा यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते राहुल गांधींच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले. निर्भयाचे आईवडीलही या मोर्चात सहभागी झालेत. मध्यरात्री काढलेल्या या मार्चमध्ये काही कार्यकर्त्यांमध्ये अचानक गोंधळ उडाला आणि प्रियांका गांधींसह महिलांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटनाही घडली. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काही जण सेल्फी काढण्यात मग्न असल्याचेही दिसून आले. निर्भया बलात्काराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत एवढ्या मोठ्या प्रमाणात कँडल मार्च निघाल्याचे दिसून आले.महिलांवर होणारे अत्याचार हा राजकीय विषय नसून राष्ट्रीय विषय झालाय. रस्त्यावर उतरलेल्या जनक्षोभाकडे पाहून तुम्हाला हे समजलंच असेल. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. महिला अत्याचाराविरोधात सरकारनं कडक पावलं उचलावीत, अशी आमची अपेक्षा असल्याचं राहुल गांधी यांनी कँडल मार्चवेळी सांगितले.कँडल मार्चसंदर्भातील अपडेट्स- राहुल गांधी कँडल मार्चच्या ठिकाणावरून गेल्यानंतर गर्दी ओसरली- राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कँडल मार्चच्या ठिकाणावरून पुन्हा निवासस्थानाकडे परतले- प्रियंका गांधी आणि महिलांना काँग्रेस कार्यकर्त्यांची धक्काबुक्की- पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना थांबवल्यानंतर ते जमिनीवर बसले- नफिसा अली, अंबिका सोनी, शोभा ओझा यांच्यासह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी झालेत. - राहुल गांधींनी हा कार्यक्रम तयार केला, प्रियंका गांधीही या मोर्चात सहभागी- इंडिया गेटवरच्या कँडल मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश - काँग्रेसच्या ऑफिसमधून कँडल मार्चला सुरुवातझोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आम्ही हा कँडल मार्च काढला. पंतप्रधान बेटी पढाओ, बेटी बचावच्या घोषणा देत असतात. परंतु त्यांच्याच राज्यात मुलींवर अत्याचार होत आहेत. आरोपींना वाचवणा-या त्यांच्या मंत्र्यांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतीही कारवाई करत नाही, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. राहुल गांधींनी या कँडल मार्चसंदर्भात गेल्या काही वेळापूर्वी ट्विटरद्वारे माहिती दिली होती. ते म्हणाले होते. उन्नाव-कठुआ बलात्कार प्रकरणामुळे इतरांप्रमाणे मलाही अतीव दुःख झाले. महिलांशी अशा प्रकारचं गैरवर्तन सहन केलं जाणार नाही. या बलात्काराच्या निषेधार्थ मी इंडिया गेटवर कँडल मार्च काढणार आहे. तुम्हीही माझ्यासोबत सहभागी व्हा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं होतं. उन्नाव-कठुआ बलात्कारप्रकरणी राहुल गांधींनी नरेंद्र मोदींनाही लक्ष केलं होतं. तसेच या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकारात कोणी दोषी व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न कसा काय करू शकतो?, अशा प्रश्न विचारत मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. अशा विकृत लोकांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी, असंही म्हणत राहुल गांधींनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला होता. तुम्हीही माझ्यासोबत सहभागी व्हा राहुल गांधींच्या या आवाहनाला दिल्लीतील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. हजारो तरुण-तरुणी या मार्चमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील काँग्रेस कार्यकर्तेही इंडिया गेटवर यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण