राहुल गांधींच्या ‘ट्विटर धोरणा’नं सर्वांच्याच भुवया उंचावल्या, एकाच दिवसात अनेक नेत्यांना-पत्रकारांना केलं अनफॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 04:24 PM2021-06-02T16:24:37+5:302021-06-02T16:25:32+5:30

राहुल यांच्या या अ‍ॅक्शनची चर्चा तीव्र झाल्यानंतर, काँग्रेस पक्षातील सूत्रांनी माहिती दिली, की ही एक एक्सरसाइज आहे. राहुल गांधींचे अकाउंट रिफ्रेश केले जात आहे. लवकरच काही लोकांची यादी तयार होईल. ज्यांना राहुल गांधी ट्विटरवर फॉलो करतील. यात आता अनफॉलो केलेल्या लोकांचाही समावेश असू शकेल. (Rahul gandhi)

Rahul gandhi unfollow many people on twitter leaders journalists politics | राहुल गांधींच्या ‘ट्विटर धोरणा’नं सर्वांच्याच भुवया उंचावल्या, एकाच दिवसात अनेक नेत्यांना-पत्रकारांना केलं अनफॉलो

राहुल गांधींच्या ‘ट्विटर धोरणा’नं सर्वांच्याच भुवया उंचावल्या, एकाच दिवसात अनेक नेत्यांना-पत्रकारांना केलं अनफॉलो

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे खासदार राहुल गांधी सध्या ट्विटरवर चर्चेचा विषय आहेत. कारण त्यांनी मंगळवारी अनेक नेत्यांना आणि पत्रकारांना ट्विटरवर अनफॉलो केलं आहे. यात त्यांच्या पक्षाचे अनेक नेते, पत्रकार आणि काही जवळच्या लोकांचा समावेश आहे. एढेच नाही, तर कार्यालयात काम करणारे काही लोक आणि दिल्लीत काम करणाऱ्या काही वरिष्ठ पत्रकारांचाही यात समावेश आहे. राहुल गांधींच्या या अ‍ॅक्शनची सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा सुरू आहे.  (Rahul gandhi unfollow many people on twitter leaders journalists politics)

राहुल यांच्या या अ‍ॅक्शनची चर्चा तीव्र झाल्यानंतर, काँग्रेस पक्षातील सूत्रांनी माहिती दिली, की ही एक एक्सरसाइज आहे. राहुल गांधींचे अकाउंट रिफ्रेश केले जात आहे. लवकरच काही लोकांची यादी तयार होईल. ज्यांना राहुल गांधी ट्विटरवर फॉलो करतील. यात आता अनफॉलो केलेल्या लोकांचाही समावेश असू शकेल. 

राहुल गांधी यांनी मंगळवारी अचानक अनेक लोकांना अनफॉलो करायला सुरुवात केली. यानंतर हा चर्चेचा विषय झाला आणि प्रत्येक जण याचा वेगवेगळा अर्थ काढू लागला. मात्र, पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांची टीम जी नवी लिस्ट तयार करत आहे, त्यात नेते-पत्रकार आणि इतर क्षेत्रांशी संबंधित लोकांचा समावेश असेल.

केंद्राची ७ वर्षे; राहुल गांधींची उपरोधिक टीका; मोदी सरकारवर हल्लाबोल

ट्विटरची स्वच्छता, की भविष्याची तयारी?
काँग्रेसकडून काहीही स्पष्टीकरण दिले जात असले, तरी राहुल गांधींच्या या अ‍ॅक्शनमुळे चर्चेला उधान आले आहे. याकडे राहुल गांधींच्या भविष्यातील रणनीतीच्या तयारीच्या दृष्टीनेही बघितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ट्विटरवर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह आणि आक्रमक आहेत.

राहुल गांधी यांनी नुकताच कोविडला मोविड, म्हणत पंतप्रधानांवर थेट हल्ला चढवला होता. भाजप नेत्यांनी यावर आक्षेपही नोंदवला. मात्र, राहुल गांधी यावर म्हटले होते, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केवळ नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. यामुळेच कोविडचे नाव मोविड, असे करण्यात आले आहे. 

राहुल गांधींच्या भाषेवरूनच टूलकिट त्यांचेच हे स्पष्ट, मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आरोपांना उत्तर

Web Title: Rahul gandhi unfollow many people on twitter leaders journalists politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.