शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:55 IST

Rahul Gandhi RSS, Winter Session Parliament: राहुल गांधी यांचे संसदेत भाषण सुरु असताना गोंधळ सुरु झाला

Rahul Gandhi RSS, Winter Session Parliament: मतदार यादीतील घोळ आणि त्याच्या सुधारणा यावरील लोकसभेच्या अधिवेशनाच्या विशेष चर्चेदरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेत म्हटले की, आरएसएसला समानतेच्या संकल्पनेबद्दल अडचणी आहेत आणि त्यांनी संवैधानिक संस्थांवर कब्जा केला आहे. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना बोलताना थांबवले आणि मतदार याद्यांमधील सुधारणांवर चर्चा करण्यास सांगितले. तसेच, LoP (एलओपी) विरोधी पक्षनेता असण्याचा असा अर्थ होत नाही की, तुम्ही तुमच्या मनाला येईल ते बोलू शकता. तुम्ही पदाचा मान राखला पाहिजे.

खादीचा उल्लेख करत भाषणाला सुरुवात

राहुल गांधी यांनी चर्चेच्या सुरुवातीला खादीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आपला देश एका कापडासारखा आहे. ज्याप्रमाणे कापड अनेक धाग्यांपासून बनलेले असते, तसेच आपला देशही अनेक लोकांपासून बनलेला आहे. देशातील कपडे हे आपल्या देशाचे प्रतिबिंब आहेत. देशातील सर्व धागे समान आणि महत्त्वाचे आहेत. देशातील सर्व लोक समान आहेत. त्यानंतर राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करायला सुरुवात केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी त्यांना मध्येच थांबवले.

RSS वर टीकास्त्र

राहुल गांधी यांनी संघाचे नाव घेताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही यावर आक्षेप घेतला. तरीही राहुल गांधी पुढे बोलतच राहिले. ते म्हणाले, "मी काहीही चुकीचे बोललो नाही. शैक्षणिक संस्था ताब्यात घेतल्या आहेत. कुलगुरूंची नियुक्ती गुणवत्तेवर नव्हे, तर एका संस्थेशी संलग्नतेवर आधारित करण्यात आली आहे. CBI आणि ED एकाच संस्थेशी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेत आहेत. देशातील निवडणुकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेला दुसऱ्या संस्थेकडून नियंत्रित केले जात आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधींना सुनावलं

अखेर लोकसभा अध्यक्षांनी राहुल यांना सुनावले. ओम बिर्ला म्हणाले, "विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलू शकता. तुम्ही निवडणूक सुधारणांवर चर्चा करा." दरम्यान, यामुळे संसदेत एकच गोंधळ उडाला. किरेन रिजिजू म्हणाले, "आम्ही मुद्दे ऐकण्यासाठी आलो आहोत. निवडणूक सुधारणांवर भाष्य करणे जास्त उचित ठरेल. सरकार निवडणूक सुधारणांसाठी तयार आहे. त्यावर बोलावे."

English
हिंदी सारांश
Web Title : Om Birla scolds Rahul Gandhi in Parliament, restricts irrelevant speech.

Web Summary : Speaker Om Birla rebuked Rahul Gandhi in Parliament for digressing from voter list reforms debate and mentioning RSS. Birla emphasized that being Leader of Opposition doesn't allow irrelevant speech and urged him to maintain decorum and discuss relevant issues.
टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीom birlaओम बिर्लाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ