शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणुकीत पक्षाविरोधात काम केलेल्यांविरोधात होणार कारवाई, राहुल गांधींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 20:51 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गुजरातच्या दौ-यावर असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची आक्रमक शैली पाहायला मिळाली

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शनिवारी गुजरातच्या दौ-यावर असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची आक्रमक शैली पाहायला मिळाली. शनिवारी (23 डिसेंबर) राहुल गांधी यांनी गुजरातमधील पराभवाला पक्षातील लोकांनीच केलेला घात जबाबदार असल्याचे सांगितले. ज्यांनी पक्षाविरोधात काम केले, पक्षाला साथ दिलेली नाही, अशांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. '90 टक्के लोक आमच्यासोबत लढले तसेच अनेकांनी निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने प्रयत्न केले. मात्र, 5 ते 10 टक्के लोक असे होते ज्यांनी काँग्रेसला कसलीच मदत केली नाही, अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.’ असा इशारा यावेळी राहुल गांधी यांनी दिला. सोबत यावेळी त्यांनी भाजपावर हल्लाबोलही केला. काँग्रेस पक्ष एकत्रितपणे उभा राहतो तेव्हा पराभव होत नाही. निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी आपण जिंकलो. ते रागाने निवडणूक लढले त्यांच्याकडे सगळी साधने होती. पण आपण सत्याने, प्रेमाने निवडणूक लढलो असे राहुल म्हणाले.

भाजपाच्या आकस, द्वेषपूर्ण प्रचारामुळे पराभव झाला असे राहुल यांनी सांगितले. मागच्या वीस वर्षात भाजपा आणि मोदींनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात राबवलेली बदनामीची मोहिम हे काँग्रेसच्या पराभवामागचे कारण आहे असे राहुल म्हणाले. भाषणाच्या शेवटी राहुल यांनी विजयाबद्दल भाजपाचे अभिनंदन करताना पुढची पाचवर्ष काँग्रेस सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल असे सांगितले.  गुजरात दौ-यावर आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी गुजरात निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले. गुजरातमध्ये पुढचे सरकार काँग्रेस स्थापन करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या निवडणुकीत गुजरातमध्ये नवीन नेतृत्व उदयाला येत असल्याचे दिसले. राज्यात पुढचे सरकार आपले असेल असे त्यांनी सांगितले. पुढच्या निवडणुकीत गुजरातमध्ये आपण 135 जागा जिंकू, असेही राहुल यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाcongressकाँग्रेस