टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 19:17 IST2021-04-12T19:15:36+5:302021-04-12T19:17:10+5:30

Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लस महोत्सवावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

rahul gandhi says first of all modi govt should give corona vaccine to all state | टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले

टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले

ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलकोरोना लसीकरणावरून साधला निशाणाकेंद्राच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट - राहुल गांधी

नवी दिल्ली: महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने हाहाःकार केला असून, गेल्या काही सलग दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येने १.२५ लाखांचा टप्पा ओलांडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोना लसींचा (Corona Vaccination) तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यांमधून केल्या जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लस महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. टाळी-थाळी, उत्सव खूप झाले, आता देशाला लस द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. (rahul gandhi says first of all modi govt should give corona vaccine to all state)

राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदाल हल्लाबोल केला. गेल्या ३८५ दिवसांत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकता आलेली नाही. उत्सव, टाळी-थाळी खूप झाले, आता देशाला लस द्या, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. या ट्विटसह राहुल गांधी यांनी देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करणारा व्हिडिओ शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

दुसरी लाट आहे आणि लाखो कोरोना बळी

कोरोना विरोधातील लढाई १८ दिवसांत जिंकली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजवून घेतल्या, मोबाइल लाइटही लावायला लावला. मात्र, कोरोना वाढतच गेला. आता दुसरी लाट आहे आणि लाखो जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या कुणाला लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या. लसीची निर्यात बंद करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. 

कुराणसंदर्भातील 'ती' याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंड

केंद्राच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट

केंद्र सरकारच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केला. स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचे जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणे आवश्यक आहे. मात्र, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी  आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला होता. 

“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

दरम्यान, कोरोनाचा फैलाव युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले होते. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले होते. 
 

Web Title: rahul gandhi says first of all modi govt should give corona vaccine to all state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.