शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:01 IST

Raebareli Lok Sabha Election 2024: काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली.

Rahul Gandhi : रायबरेली : राहुल गांधी यांनी शुक्रवारी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि अशोक गेहलोत उपस्थित होते. शुक्रवारी सकाळीच काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी वड्रा, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतरांसह रायबरेलीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले होते.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपले पत्ते उघड केले. काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली. रायबरेली आणि अमेठीच्या जागांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आज रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली.

दुसरीकडे, अमेठीतील काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, याआधी प्रियांका गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र यादी जाहीर झाल्यानंतर सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला. किशोरीलाल शर्मा यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, "या निवडणुकीतही मी खांद्याला खांदा लावून लढणार आहे. आम्ही या निवडणुका तुमच्यासाठी लढवणार आहोत, कारण तुमचा विकास व्हावा. आता संधी चालून आली आहे. असा संदेश देशाला देण्याची की, आम्ही सेवेचे राजकारण करतो. ही तुमची निवडूक आहे, तुम्ही जिंकाल. मी 6 मे पर्यंत अमेठीत राहीन. अमेठीची निवडणूक जनतेच्या बळावर जिंकू." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४rae-bareli-pcरायबरेलीcongressकाँग्रेस