शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Rafale Deal: काँग्रेस-भाजपामध्ये सोशल मीडियावर जुंपली; #MeraPMChorHai ट्रेंडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 8:18 AM

काँग्रेस आणि भाजपामध्ये ट्विटरवर घमासान

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन पुन्हा एकदा देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानामुळे फ्रान्ससह भारतातही खळबळ माजली आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणाले. त्यामुळे आता तरी मोदींनी मौन सोडावं आणि देशाला सत्य सांगावं, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य केलं. यानंतर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर पलटवार केला. राहुल गांधी यांचं घराणंचं भ्रष्टाचाराची जननी असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारकडून राफेल करारासाठी केवळ अनिल अंबानींच्या रिलायन्सचं नाव सुचवण्यात आल्यानं फ्रान्सच्या डॅसो एव्हिऐशन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असं विधान फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केलं होतं. यावरुन राहुल गांधींनी मोदींवर टीकेची झोड उठवली. 'मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठी मागच्या दारानं करारात बदल केले. मोदी आणि अंबानी यांच्यात काय डील झालं हे देशाला कळायला हवं. मोदी आणि अंबानी यांनी देशाच्या संरक्षण दलांवर 1 लाख 30 हजार कोटी रुपयांचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे,' असा घणाघात राहुल यांनी केला. फ्रान्सचे माजी अध्यक्ष मोदींना चोर म्हणाले, अशा तिखट शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं. यानंतर ट्विटरवर #MeraPMChorHai ट्रेंडमध्ये आला. राहुल गांधींच्या या आरोपांना केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी उत्तर दिलं. राफेल डीलचा तपशील उघड करुन राहुल गांधी पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप प्रसाद यांनी केला. राफेल डीलमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि पंतप्रधानांना चोर म्हणणाऱ्या राहुल यांचा प्रसाद यांनी समाचार घेतला. राहुल यांचं घराणंचं भ्रष्टाचाराची जननी असल्याचं प्रसाद यांनी म्हटलं. यानंतर सोशल मीडियावर #RahulKaPuraKhandanChor ट्रेंडमध्ये आला. ट्विटरवर कालपासून हे दोन्ही हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहेत. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAnil Ambaniअनिल अंबानीRelianceरिलायन्सcongressकाँग्रेसBJPभाजपा