जग कुठे चाललंय आणि तुम्ही चौकीदार बनवताय ते सुद्धा चोर, सिद्धूंचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 19:22 IST2019-04-11T19:21:35+5:302019-04-11T19:22:38+5:30

माजी क्रिकेटपटू आणि सध्या पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपाच्या मै भी चौकिदार अभियानावर जोरदार टीका केली आहे.

Punjab Minister Navjot Singh Sidhu attack on BJP's campaign | जग कुठे चाललंय आणि तुम्ही चौकीदार बनवताय ते सुद्धा चोर, सिद्धूंचा मोदींना टोला

जग कुठे चाललंय आणि तुम्ही चौकीदार बनवताय ते सुद्धा चोर, सिद्धूंचा मोदींना टोला

रायपूर-  माजी क्रिकेटपटू आणि सध्या पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपाच्या मै भी चौकिदार अभियानावर जोरदार टीका केली आहे. जग कुठे चाललं आहे आणि तुम्ही चौकीदार बनवताय, ते सुद्धा चोर, असा टोला सिद्धू यांनी लगावला आहे. 

राफेल विमान घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना चौकीदार चोर है चा नारा दिला होता. त्यानंतर भाजपाने मै भी चौकीदार चा नारा देत राहुल गांधी आणि काँग्रेसला प्रत्युत्तर दिले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नावासमोर चौकीदार लावण्यास सुरुवात केली होती. यावरूनच नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. 





आज रायपूर येथे आलेल्या सिद्धू यांनी भाजपाच्या मै भी चौकीदार अभियानाची खिल्ली उडवली. "जग कुठे चालले आहे. चीन समुद्राखाली रेल्वे मार्ग बांधत आहे. अमेरिका मंगळ ग्रहावर जावून जीवनाचा शोध घेत आहे. रशिया रोबोटीक आर्मी बनवत आहे आणि तुम्ही चौकीदार बनवत आहात, ते सुद्धा चोर.'' असा टोला सिद्धू यांनी लगावला.   

Web Title: Punjab Minister Navjot Singh Sidhu attack on BJP's campaign