Punjab Election 2022 : "या माणसाला डोक्याचा भाग नाही..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नवज्योत सिंग सिद्धूंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 11:39 AM2022-01-24T11:39:31+5:302022-01-24T12:04:30+5:30

Amarinder Singh And Navjot Singh Sidhu : सोनिया गांधी यांनी सिद्धू काँग्रेससाठी कसे आहेत विचारल्यानंतर ते सदस्य होण्याच्या लायक नाहीत, असं सांगितलं पण काँग्रेसने ऐकलं नाही असं देखील अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. 

punjab election 2022 Amarinder Singh anger erupted on Navjot Singh Sidhu said this man has no brain at all | Punjab Election 2022 : "या माणसाला डोक्याचा भाग नाही..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नवज्योत सिंग सिद्धूंवर हल्लाबोल

Punjab Election 2022 : "या माणसाला डोक्याचा भाग नाही..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नवज्योत सिंग सिद्धूंवर हल्लाबोल

Next

नवी दिल्ली - पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेसचे पंजाब अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नवज्योत सिंग सिद्धू असंतुलित असून त्यांना डोक्याचा भाग नाही, असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. तसेच सोनिया गांधी यांनी सिद्धू काँग्रेससाठी कसे आहेत विचारल्यानंतर ते सदस्य होण्याच्या लायक नाहीत, असं सांगितलं पण काँग्रेसने ऐकलं नाही असं देखील अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. 

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी "मला नवज्योत सिंग सिद्धूंवर बोलायचं नाही. कारण मी त्यांना कायम असंतुलितच म्हटलं आहे. मी पहिल्या दिवसापासून या माणसाकडे डोक्याचा भाग नाही असंच म्हटलं आहे. त्यांना केवळ वेळ वाया घालवायचं माहिती आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच मला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेससाठी योग्य आहेत का याविषयी माहिती काढण्यास सांगितलं होतं. तेव्हा मी सिद्धू काँग्रेसचा सदस्य बनण्याच्या लायक नाही असं सांगितलं होतं. काँग्रेसने ते ऐकलं नाही, तो त्यांचा निर्णय आहे. त्यांना याचा अनुभव येईल असंही सांगितलं.

नवज्योत सिंग सिद्धूंसोबतच्या एका बैठकीचा देखील कॅप्टन यांनी उल्लेख केला आहे. "आम्ही दोघ दिल्लीतील इंपिरिअल हॉटेलमध्ये भेटलो. मी सिद्धूंसोबत चर्चा सुरू केली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी एक शिवलिंग समोर ठेवलं. मी हे कशासाठी विचारलं तर ते म्हटले ही माझी सवय आहे. आम्ही बराच वेळी चर्चा केली. सिद्धूंनी सांगितलं की ते रोज सहा तास ध्यानधारणा (मेडिटेशन) करतात. ध्यान करताना काय करता असं विचारलं तर ते सिद्धूंनी देवासोबत बोलतो असं सांगितलं."

"मी सोनिया गांधींना हा माणूस "दिवाना" असल्याचं सांगितलं"

देवासोबत नेमकं काय बोलता? असं विचारल्यावर सिद्धू म्हणाले तुमच्यासोबत जसं बोलतो तसंच देवासोबत बोलतो. बऱ्याच दिवसांपासून पाऊस पडला नाही, पाऊस कधी पाडणार असं मी देवाला विचारत असल्याचं सिद्धूंनी त्यावेळी सांगितलं. हे ऐकून मी सोनिया गांधींना हा माणूस "दिवाना" असल्याचं सांगितलं अशी माहिती कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली आहे. पंजाबच्या निवडणुकीकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: punjab election 2022 Amarinder Singh anger erupted on Navjot Singh Sidhu said this man has no brain at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.