निवृत्त अधिकाऱ्याने केला गोळीबार, मुलाचा जागीच मृत्यू, पत्नी आणि सून जखमी, धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:14 IST2025-07-04T14:11:13+5:302025-07-04T14:14:13+5:30

Punjab Crime News: कौटुंबिक वादातून निवृत्त अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात मुलाचा मृत्यू झाल्याची तर पत्नी आणि सून जखमी झाल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील अमृतसर येथे घडली आहे.

Punjab Crime News: Retired officer opened fire, son died on the spot, wife and daughter-in-law injured, shocking reason revealed | निवृत्त अधिकाऱ्याने केला गोळीबार, मुलाचा जागीच मृत्यू, पत्नी आणि सून जखमी, धक्कादायक कारण आलं समोर

निवृत्त अधिकाऱ्याने केला गोळीबार, मुलाचा जागीच मृत्यू, पत्नी आणि सून जखमी, धक्कादायक कारण आलं समोर

कौटुंबिक वादातून निवृत्त अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात मुलाचा मृत्यू झाल्याची तर पत्नी आणि सून जखमी झाल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील अमृतसर येथे घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत गोळाबार करणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्याला पकडले. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गोळीबार करणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्याचं नाव तरसेम सिंह असं आहे. तो सीआरपीएफमधील निवृत्त डीएसपी आहे. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, या कुटुंबामध्ये वैवाहिक आणि मालमत्तेवरून वाद सुरू होता. दरम्यान, हा वाद एवढा विकोपाला गेला की तरसेम सिंह याने आपल्याच कुटुंबीयांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात तरसेम सिंह याच्या मुलाला तीन गोळ्या लागल्या. तसेच त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी आणि सून या गोळीबारात जखमी झाले.

आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.  

Web Title: Punjab Crime News: Retired officer opened fire, son died on the spot, wife and daughter-in-law injured, shocking reason revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.