JEE Advanced Result 2020 : पुण्याचा चिराग फलोर 'जेईई अ‍ॅडव्हान्स'मध्ये देशात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 12:28 PM2020-10-05T12:28:03+5:302020-10-05T12:40:55+5:30

देशभरातून एक लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी 'जेईई अ‍ॅडव्हान्स' परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

Pune's Chirag Phalor first in the country in JEE Advance | JEE Advanced Result 2020 : पुण्याचा चिराग फलोर 'जेईई अ‍ॅडव्हान्स'मध्ये देशात प्रथम

JEE Advanced Result 2020 : पुण्याचा चिराग फलोर 'जेईई अ‍ॅडव्हान्स'मध्ये देशात प्रथम

Next
ठळक मुद्दे४३ हजार २०४ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण

पुणे: जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुण्यातील चिराग फलोर या विद्यार्थ्यांने परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. चिरागने ३९६ गुणांपैकी ३५२ गुण मिळवत यश संपादन केले आहे.
        जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी देशभरातून एक लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४३ हजार २०४ विद्यार्थीपरीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पैकी ६ हजार ७०७ मुली आहेत.
चिराग म्हणाला,मी मूळचा राजस्थान येथील असून  इयत्ता अकरावी बारावीचे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आहे.माझे वडील पुण्यात खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असून सध्या मी एमआयटीमध्ये बीएससी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. मला संशोधन क्षेत्रात कामगिरी करण्याची इच्छा असून ॲस्ट्रोफिजिक्स हे माझे आवडते क्षेत्र आहे.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली (IIT) कडून जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 (JEE Advanced 2020) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. विद्यार्थी JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून आपला निकाल पाहू शकतात. 

असा चेक करा निकाल

- सर्वप्रथम jeeadv.ac.in या वेबसाईटवर लॉग इन करा. 

- होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 वर क्लिक करा.

- स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर विचारलेली माहिती भरा.

- JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल.

- रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.

Web Title: Pune's Chirag Phalor first in the country in JEE Advance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app