शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

इस्रोच्या मदतीने ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 04:50 IST

भारतातील बहुतांश पुरातत्वीय स्मारक, वास्तू या शहरांपासून लांब, दुर्गम भागांमध्ये आहेत. त्यांचे जतन करण्यास सरकारी यंत्रणा अपुरी पडते.

- नितीन नायगावकर नवी दिल्ली : भारतातील बहुतांश पुरातत्वीय स्मारक, वास्तू या शहरांपासून लांब, दुर्गम भागांमध्ये आहेत. त्यांचे जतन करण्यास सरकारी यंत्रणा अपुरी पडते. त्यामुळे राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने २०१६ मध्ये इस्रोेशी करार करून सॅटेलाईटद्वारे पुरातत्वीय वारशांना संरक्षण दिले. परिणामी, पुरातत्व सर्वेक्षणच्या अखत्यारीतील ३,६०० वास्तूंवर नियंत्रण ठेवणे इस्रोमुळेच शक्य होत आहे.प्रत्येक राज्यात काही ऐतिहासिक वास्तू केंद्रे, तर काही राज्ये सरकारच्या अखत्यारीत आहेत. बरीच मंदिरे, गड-किल्ले अतिक्रमणाच्या विळख्यातून गेल्या काळात सोडविण्यात आली आहेत; पण वस्ती वाढ व घरांची उंची वाढल्याने ऐतिहासिक वारशाचे महत्त्व राखण्यास अडथळा येतो. उंचावरील किंवा तळघरातील वास्तूंना त्याचा धोका नाही; पण गावांच्या मधोमध वा अगदी शहरांलगतच्या वास्तूंना नक्कीच आहे. या वास्तूंच्या शंभर मीटर परिसरात बांधकामास बंदी असली तरीही यावर नियंत्रण ठेवणे अवघड जात असल्याने केंद्र सरकारने २०१० मध्ये राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची स्थापना केली. त्यामुळे इस्रोेद्वारे या सर्व स्मारकांना संरक्षण देण्यात आले.आता राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर भुवन अ‍ॅपद्वारे इस्रोच्या पोर्टलवर जाता येते. या पोर्टलवर ३,६०० पैकी कुठल्याही स्मारकाच्या कक्षा पाहता येतात. शंभर मीटरच्या कक्षेतील घर पाडून नवे घर बांधता येत नाही. जुन्याच घरात बदल करण्याची परवानगी आहे, तर तीनशे मीटरच्या कक्षेतील घरांना कुठलेही बांधकाम करायचे असेल, तर स्मारक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. पूर्वी परवानगीसाठीही एक वर्ष लागायचे. आता आॅनलाईन सुविधेमुळे अवघ्या महिनाभरात कार्यवाही होते. दरवर्षी सुमारे एक हजार अर्ज येतात, असे प्राधिकरणाचे सदस्य सचिव नवनीत सोनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.>मुख्य सचिवांना पत्रराष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची आॅनलाईन यंत्रणा अवलंबण्यासाठी प्राधिकरणाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.ऐतिहासिक स्मारकाच्या परिसरात राहणाऱ्यांना घराच्या बांधकामाची परवानगी घेण्यासाठी पारंपरिक यंत्रणेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे नवनीत सोनी म्हणाले.>सध्या मुंबई व दिल्ली या दोनच शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्राधिकरणाची आॅनलाईन यंत्रणा स्वीकारली आहे. येत्या काळात पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश ही राज्येही जुळणार आहेत.

टॅग्स :isroइस्रो