शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांचे आरक्षण वाढवून पाच टक्के करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: August 24, 2016 05:15 IST

‘पर्सन्स विथ डिसेबिलिटिज (इक्वल अपॉर्च्युनिटिज, प्रोटेक्शन आॅफ राईट्स अ‍ॅण्ड फुल पार्टिसिपेशन) अ‍ॅक्ट’ हा कायदा पूर्णपणे नव्याने करण्याचा केंद्र सरकारचा विचार

नवी दिल्ली : अपंगांना समान संधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २० वर्षांपूर्वी केलेला ‘पर्सन्स विथ डिसेबिलिटिज (इक्वल अपॉर्च्युनिटिज, प्रोटेक्शन आॅफ राईट्स अ‍ॅण्ड फुल पार्टिसिपेशन) अ‍ॅक्ट’ हा कायदा पूर्णपणे नव्याने करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून त्यासाठी एक विधेयक तयार करण्यात येत आहे. त्यात सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये अपंगांसाठी असलेले आरक्षण दोन टक्क्यांनी वाढविण्याचा व अपंगत्वाची व्याख्या अधिक व्यापक करून त्यात नव्या प्रवर्गांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने या नव्या विधेयकाचा कच्चा मसुदा तयार केला. त्यानंतर पंतप्रधानांनी हा मसुदा तपासून त्यात सुधारणा सुचविण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगट नेमला. मंत्रीगटाच्या सूचना आता पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविल्या गेल्या आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात २.७ कोटी अपंग आहेत.सध्याच्या कायद्यानुसार सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये अपंगांसाठी तीन टक्के आरक्षणाची तरतूद आहे. हे आरक्षण शारीरिक अपंग, दृष्टिहिन आणि मूक-बधीर यांच्यासाठी प्रत्येकी एक टक्का आहे. नव्या विधेयकाच्या मसुद्यात हे आरक्षण दोन टक्क्यांनी वाढवून पाच टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.अपंगत्वाची व्याख्या अधिक व्यापक करून आरक्षणासाठी पात्र असणाऱ्यांची वर्गवारी सातवरून वाढवून १९ करण्याचेही सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रस्तावित केले आहे. यात काही प्रकारचे मानसिक आजार हेही अपंगत्व मानावे, असे सुचविण्यात आले आहे. विशेष म्हणजे अ‍ॅसिड हल्ल्यामुळे विद्रुपता येणाऱ्या व्यक्तींचाही अपंगामध्ये समावेश करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>दोन मंत्रालयांमध्ये मतभेदविधेयकातील काही तरतुदींवरून सामाजिक न्याय आणि कार्मिक या दोन मंत्रालयांमध्ये मतभेद आहेत. सामाजिक न्याय मंत्रालयाने मानसिक आजार असलेल्या व्यक्तींनाही अपंग मानावे असे प्रस्तावित केले असून त्यात स्क्रिझोफ्रेनिया (दुभंग व्यक्तिमत्व), एपिलेप्सी (अपस्मार) आणि बायपोलर डिस्आॅर्डर (उन्माद) या मानसिक व्याधींचाही समावेश केला आहे. मात्र कार्मिक मंत्रालयाचा यास आक्षेप असून अशा मनोरुग्णांची सरकारी नोकरीसाठी योग्यता व उपयुक्तता कशी ठरवावी, असा त्यांचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे कार्मिक मंत्रालय पंतप्रधानांकडेच आहे. दोन्ही मंत्रालयांनी आपापली मते दिली आहेत. आता त्यावर निवाडा पंतप्रधानांनी करायचा आहे.