प्रियंका गांधी करणार यूपीत प्रचाराला प्रारंभ

By Admin | Updated: October 10, 2016 04:36 IST2016-10-10T04:36:14+5:302016-10-10T04:36:14+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशात सुरू केलेली ३५०० किलोमीटरची ‘किसान यात्रा’ या आठवड्यात संपत आहे. पक्षाने आता योजना क्रमांक दोन

Priyanka Gandhi launches campaign for UP | प्रियंका गांधी करणार यूपीत प्रचाराला प्रारंभ

प्रियंका गांधी करणार यूपीत प्रचाराला प्रारंभ

मेरठ : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशात सुरू केलेली ३५०० किलोमीटरची ‘किसान यात्रा’ या आठवड्यात संपत आहे. पक्षाने आता योजना क्रमांक दोन राबवायचे ठरवले असून प्रियंका गांधी- वड्रा नोव्हेंबरच्या सुरवातीला किंवा डिसेंबरअखेर प्रचार मोहीम सुरू करतील, असे पक्षातील वरिष्ठ नेत्याने सांगितले.
हा नेता म्हणाला, उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत असून प्रियंका गांधी-वड्रा या तीत प्रचार करतील. त्यांच्या येण्यामुळे राहुल गांधी यांनी पक्षाला मिळवलेला उत्साहच टिकेल असे नाही तर त्यात भरही पडेल. प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात १५० प्रचार सभांत भाषण करतील, असे नियोजन आहे.
काँग्रेस पक्षाचा प्रवास अडखळत सुरू असताना राहुल गांधी यांच्या किसान यात्राने त्याला चेतना दिली, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच लोक पक्षाबद्दल सकारात्मक बोलत आहेत. इतर पक्षांनी अद्याप जनतेशी संवाद साधणेही सुरू केलेले नाही, असे हा नेता म्हणाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Priyanka Gandhi launches campaign for UP