प्रियदर्शिनी चॅटर्जी मिस इंडिया 2016ची विजेती

By Admin | Updated: April 10, 2016 11:50 IST2016-04-10T11:46:59+5:302016-04-10T11:50:48+5:30

जगाच्या सौंदर्यात भर टाकणा-या एफबीबी फेमिना मिस इंडिया 2016चा किताब प्रियदर्शिनी चॅटर्जीनं पटकावला आहे.

Priyadarshini Chatterjee winning the Miss India 2016 | प्रियदर्शिनी चॅटर्जी मिस इंडिया 2016ची विजेती

प्रियदर्शिनी चॅटर्जी मिस इंडिया 2016ची विजेती

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १०- जगाच्या सौंदर्यात भर टाकणा-या एफबीबी फेमिना मिस इंडिया 2016चा किताब प्रियदर्शिनी चॅटर्जीनं पटकावला आहे. 9 एप्रिलला यश राज स्टुडिओमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रियदर्शिनी चॅटर्जीला मिस इंडिया 2016 घोषित करण्यात आलं आहे. मिस इंडिया हा किताब पटकावलेल्या प्रियदर्शिनी चॅटर्जी मिस वर्ल्ड 2016ला भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी पंखुरी गिडवानी हिला रनर या कॅटगरीत एफबीबी फेमिना मिस इंडिया 2016चं दुसरं पारितोषिक मिळालं आहे. तर सुश्रूती क्रिष्णा हिला रनर अप कॅटेगरीत पहिला पारितोषिक मिळालं आहे. मात्र प्रियदर्शिनी चॅटर्जी यावेळी मिस इंडिया 2016ची विजेती ठरली आहे. या कार्यक्रमाला दिग्गज बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती.

Web Title: Priyadarshini Chatterjee winning the Miss India 2016