शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीतील जयापूर गाव पंतप्रधान दत्तक घेणार

By admin | Updated: November 7, 2014 04:13 IST

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघास शुक्रवार आणि शनिवारी प्रथमच भेट देणार

वाराणसी : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघास शुक्रवार आणि शनिवारी प्रथमच भेट देणार असून त्यात इतर कार्यक्रमांखेरीज मोदी वाराणसीचे लोकसभा सदस्य या नात्याने मतदारसंघातील जयापूर हे गाव ‘दत्तक’ घेण्याची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेऊन जयापूर गाव झटपट स्वच्छ करण्याची प्रशासनाची धावपळ सुरु आहे.केंद्र सरकारने अलीकडेच ‘खासदार आदर्श ग्राम योजना’ जाहीर केली असून यात प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा ‘आदर्श गाव’ म्हणून विकास करणे अपेक्षित आहे. अधिकृत घोषणा अद्याप व्हायची असली तरी या योजनेनुसार मोदी जयापूर गाव ‘दत्तक’ घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मोदी स्वत: शुक्रवारी जयापूरला भेट देणार असून त्यावेळी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात याची घोषणा होऊ शकते. तसे झाले तर गावात अद्ययावत आरोग्य केंद्र, माध्यमिक शाळा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पेयजल योजना, पोस्ट आॅफिस व बँकांच्या शाखा अशा सोयी होतील, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातील ज्या रोहानिया भागात, प्रतिबंधात्मक आदेश असूनही उमेदवारी अर्ज भरताना प्रचंड मिरवणूक काढली म्हणून मोदींवर निवडणूक आयोेगाने नाराजी व्यक्त केली होती त्याच रोहानिया विधानसभा क्षेत्रात जयापूर गाव येते. राजा तालाब तालुक्यात येणारे हे गाव वाराणसी शहरापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर आहे. चार हजार लोकवस्तीच्या या गावात मतदारांची संख्या २,७०० आहे. एकही मुस्लिम व्यक्ती नसलेल्या जयापूरमध्ये भूमिहार आणि पटेल समाजाचे प्राबल्य आहे.पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचा आपल्या मतदारसंघाचा हा पहिलाच दौरा आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर त्यावेळचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांच्यासोबत मोदींनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात पूजाअर्चा केली होती व दशअश्वमेध घाटावर गंगा आरती केली होती. (वृत्तसंस्था)