शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सल्लागार पी.के.सिन्हा यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 17:39 IST

यापूर्वी सिन्हा यांनी मंत्रिमंडळ सचिव म्हणूनही सांभाळली होती जबाबदारी

ठळक मुद्देयापूर्वी सिन्हा यांनी मंत्रिमंडळ सचिव म्हणूनही सांभाळली होती जबाबदारीत्यांनी अनेक मोठ्या पदांवरही बजावलं आहे कर्तव्य

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे प्रधान सल्लागार पी.के. सिन्हा यांनी मंगळवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७७ च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. सिन्हा यांना सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधानांच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्त करण्यात आलं होतं. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणूनही कर्तव्य बजावलं आहे. तसंच त्यांनी चार वर्ष मंत्रिमंडळ सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. याव्यतरिक्त सिन्हा हे ऊर्जा मंत्रालयात सचिवपदीही कार्यरत होते. सिन्हा यांनी १३ जून २०१५ ते ३० ऑगस्ट २०१९ या कालावधीत मंत्रिमंडळ सचिव म्हणून काम पाहिलं आहे. सिन्हा हे उत्तर प्रदेश कॅडरच्या १९७७ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत सरकारच्या निरनिराळ्या खात्यांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.  पी.के. सिन्हा हे पंतप्रधान कार्यालयातील दुसरे असे अधिकारी आहेत ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेले  नृपेंद्र मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सिन्हा यांना मे २०१५ मध्ये दोन वर्षांसाठी मंत्रिमडळ सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला. त्यानंतर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधान सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन्स महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. नंतर त्यांनी आपल्या सेवेदरम्यान, पब्लिक अॅ़डमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदविका आणि सोशल सायन्समध्ये एम. फिल.चं शिक्षण पूर्ण केलं.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीResignationराजीनामा