"पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सभापतींच्या मागे लपून बसलेत"; प्रियांका गांधींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:38 IST2026-02-05T17:24:35+5:302026-02-05T17:38:49+5:30

पंतप्रधान मोदी लोकसभा अध्यक्षांच्या मागे लपून त्यांना हे सर्व सांगायला लावत आहेत, असा दावा प्रियांका गांधी यांनी केला.

"Prime Minister Narendra Modi is now hiding behind the Speaker"; Priyanka Gandhi's counterattack | "पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सभापतींच्या मागे लपून बसलेत"; प्रियांका गांधींचा पलटवार

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सभापतींच्या मागे लपून बसलेत"; प्रियांका गांधींचा पलटवार

खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विरोधी पक्षाचे सदस्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनपेक्षित घटना घडवण्याचा कट रचत आहेत हा दावा "पूर्णपणे खोटा आणि मूर्खपणा" असल्याचे सांगत फेटाळून लावला. पंतप्रधान आता सभापतींच्या मागे लपून बसले आहेत असा दावा प्रियांका गांधी यांनी केला. पंतप्रधानांकडे सभागृहात येण्याचे धाडस नसताना ते सभापतींना खोटे बोलण्यास भाग पाडत आहेत असा आरोपही प्रियांका गांधी यांनी केला आहे.

"पंतप्रधान लोकसभा अध्यक्षांच्या मागे लपून बसले आहेत आणि त्यांना हे सर्व सांगायला लावत आहेत. पंतप्रधानांना सभागृहात येण्याची हिंमत नव्हती. ते सभागृहात आले नाहीत कारण त्यांच्या आसनासमोर तीन महिला खासदार उभ्या होत्या. हा कसला मूर्खपणा आहे?, असा सवालही गांधी यांनी केला.

काल लोकसभेत बोलता आले नव्हते, मोदी आज राज्यसभेत बोलणार; धन्यवाद प्रस्ताव की विरोधकांवर तोफ डागणार...

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात सांगितले की, काल अनेक काँग्रेस नेते सभागृहनेत्याच्या आसनाजवळ पोहोचून अनपेक्षित घटना घडवू इच्छित होते, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी विनंतीवरून सभागृहात आले नाहीत. बुधवारी काही विरोधी सदस्य ज्या पद्धतीने त्यांच्या दालनात आले आणि लोकसभेच्या स्थापनेपासून कधीही न पाहिलेले वर्तन केले आणि हे दृश्य 'काळ्या डागासारखे' होते, असा आरोपही ओम बिर्ला यांनी केला. "कालची घटना देशाने पाहिली आहे, महिला सदस्य तिथे कसे पोहोचल्या. हे कोणत्याही प्रकारे योग्य नव्हते."

लोकसभेत चार दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ गुरुवारीही सुरू राहिला आणि विरोधकांच्या गोंधळादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराशिवाय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तीन वेळा तहकूब झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांना दिलेल्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचा उल्लेख करून चीनसोबतच्या वादाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सभापती बिर्ला यांनी नियमांचा हवाला देत तो फेटाळून लावला. 

सकाळी ११ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, "काल सभागृहात घडलेल्या घटना, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधारी बाकाजवळ ज्या पद्धतीने आले ते सभागृहाच्या शिष्टाचाराशी जुळत नाहीत. सभागृहाची शिष्टाचार राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असंही बिर्ला म्हणाले.

Web Title : पीएम मोदी स्पीकर के पीछे छिप रहे: प्रियंका गांधी का हमला

Web Summary : प्रियंका गांधी वाड्रा ने स्पीकर और पीएम मोदी से जुड़े षडयंत्र के दावों का खंडन किया। उन्होंने आरोप लगाया कि मोदी संसद से बचते हैं, स्पीकर के पीछे छिपते हैं और उन्हें झूठ बोलने के लिए मजबूर करते हैं। स्पीकर ने विपक्ष के व्यवहार की आलोचना की। व्यवधान के बीच कार्यवाही स्थगित कर दी गई।

Web Title : PM Modi hiding behind Speaker: Priyanka Gandhi attacks Modi

Web Summary : Priyanka Gandhi Vadra refuted claims of a conspiracy involving the Speaker and PM Modi. She alleged Modi avoids Parliament, hiding behind the Speaker and forcing him to lie. The Speaker criticized opposition behavior. Proceedings were adjourned amidst disruption.