शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने पटकावला पंतप्रधान बॅनर

By admin | Updated: January 29, 2015 01:52 IST

नॅशनल कॅडेट कॉर्प्स(एनसीसी)चा सर्वोच्च बहुमान असणा-या पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद महाराष्ट्राला मिळाले आहे.

नवी दिल्ली : नॅशनल कॅडेट कॉर्प्स(एनसीसी)चा सर्वोच्च बहुमान असणा-या पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद महाराष्ट्राला मिळाले आहे. बुधवारी येथील कॅन्टॉनमेंट भागातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंजाबला विजेतेपदाचा तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा पुरस्कार देण्यात आला.यंदाच्या प्रजासत्ताक दिन पथ संचलनात महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाच्या अमन जगताप या कॅडेटने देशभरातील १४४ कॅडेटसचे नेतृत्व करून महाराष्ट्राला सलग दुस-यांदा हा बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्रातील ३७ मुली व ७६ मुलांसह एकूण ११३ एनसीसी कॅडेटसनी या शिबीरात सहभाग नोंदवला होता. कर्नल शहाजी जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे उपप्रमुख मेजर आर.आर.शिंदे कॅप्टन सुजाता थोरात यांचा या एनसीसी पथकात समावेश होता.प्रजासत्ताक दिनानिमित्त १ जानेवारी २०१५ पासून एनसीसी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील १७ एनसीसी विभागातील २०७० कॅडेट्सनी यात भाग घेतला. शिबीरातील विविध स्पर्धांमध्ये अव्वल क्र मांक पटकविणा-या विभागाला पंतप्रधानांच्या हस्ते पंतप्रधान बॅनर या बहुमानाने सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत पार पडलेल्या २३ एनसीसी शिबीरामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १७ वेळा हा बहुमान मिळाला असून, आज महाराष्ट्राला हा बहुमान मिळाला असता तर ५ वर्षांपासून सतत पंतप्रधान बॅनरचे विजेतेपद पटकाविणा-या महाराष्ट्राला वर्चस्वाची विक्रमी नोंद करता आली असती. (विशेष प्रतिनिधी)