शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

वीजसंकट दूर करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर भर द्या पंतप्रधानांचे आवाहन

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नवी दिल्ली : पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वाढता आयात खर्च बघता, येत्या काळात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले़ स्वस्त विजेसाठी सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात नवसंशोधनाची गरज असल्याचे ते म्हणाले़

नवी दिल्ली : पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वाढता आयात खर्च बघता, येत्या काळात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले़ स्वस्त विजेसाठी सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात नवसंशोधनाची गरज असल्याचे ते म्हणाले़
येथे आयोजित पहिल्या अपारंपरिक ऊर्जा जागतिक गुंतवणूक परिषदेच्या (रि-इन्व्हेस्ट) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जास्रोत असणाऱ्या ५० देशांचा एक गट स्थापन करण्याच्या दिशेने भारत प्रयत्नशील आहे़ अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात नवे संशोधन आणि तंत्रज्ञानाला चालना देणे आणि गरीब आणि दुर्गम भागात वीज पोहोचविणे हा यामागचा भारताचा उद्देश असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले़ देशात अद्यापही औष्णिक, जल आणि अणु ऊर्जेवर भर दिला जात आहे़ पण यापुढे सौर, पवन आणि जैवइंधन अशा ऊर्जा पर्यायांवर आपला भर असला पाहिजे़ गरीब आणि दुर्गम भागात वीज पोहोचविण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा पर्यायांवर अधिकाधिक भर देणे गरजेचे असल्याचे मोदी यावेळी म्हणाले़ देशाच्या शेवटच्या कुटुंबापर्यत वीज पोहोचत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकासाच्या फळाची चव आम आदमीला चाखता येणार नाही़ ऊर्जा उत्पादने आणि दळणवळण क्षेत्रातील विकासाशिवाय आपल्याकडे अन्य कुठलाही पर्याय नसल्याचेही ते म्हणाले़

बॉक्स
तीन दिवसांच्या या बैठकीच्या पहिल्याच दिवशी २९३ कंपन्यांनी पाच वर्षांत २६६ मेगावॅट आपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली़ भारतीय स्टेट बँकेनेही पाच वर्षांत १५ हजार मेगावॅट आपरंपरिक ऊर्जानिर्मितीसाठी आर्थिक मदतीची तयारी दर्शविली़ एनटीपीसी, सुजलॉन आणि रिलायन्स पॉवर या कंपन्यांनी अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची प्रतिबद्धता व्यक्त केली़ सुजलॉन आणि वेल्सपनने प्रत्येकी ११ हजार मेगावॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली़ तर एनटीपीसी आणि हिंदुस्तान पॉवर प्रोजेक्टस्ने प्रत्येकी हरित स्रोतांच्या माध्यमांतून १० हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले़