राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:40 IST2025-08-18T18:39:33+5:302025-08-18T18:40:21+5:30

Putin Calls PM Modi: पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे.

President Putin calls PM Modi; Details of talks with Donald Trump in Alaska given | राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती

Putin Calls PM Modi: पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांच्या एक्स हँडलवर याबद्दल माहिती दिली. विशेष म्हणजे, अलिकडेच पुतिन आणि अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्कात भेट झाली. त्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. आता त्या भेटीनंतर पुतिन यांनी थेट पीएम मोदींना फोन केल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले पीएम मोदी?
पीएम मोदींनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, "आताच मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी अलास्कामध्ये झालेल्या अलिकडील भेटीची आणि चर्चेची माहिती दिल्याबद्दल पुतिन यांचे आभार. भारताने युक्रेन संघर्षाचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण करण्याचे सातत्याने आवाहन केले आहे आणि या संदर्भातील सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या काळात देवाणघेवाणीची अपेक्षा करतो," असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

फायटर जेट, S-500 डिफेन्स सिस्टीम अन्..; पुतीन-ट्रम्प भेटीनंतर रशियाची भारताला मोठी ऑफर

पुतिन यांचा हा फोन यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आज रात्री युरोपीय नेते झेलेन्स्कीसह वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांना भेटणार आहेत. भारत आणि रशियामधील मैत्री आणि व्यापारामुळे अमेरिकेने भारतावर मोठे शुल्क लादले आहे. भारत हा रशियाचा मोठा भागीदार आहे, म्हणूनच बैठकीनंतर युरोपियन नेत्यांनी घेतलेला निर्णय रशिया आणि भारतावरही परिणाम करू शकतो. 

Web Title: President Putin calls PM Modi; Details of talks with Donald Trump in Alaska given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.