शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

अरुणाचल प्रदेशात ‘पीआरसी’ने भाजपा घायाळ; काँग्रेस ४२ जागा आणू शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 6:31 AM

लोकसभेपेक्षा विधानसभेच्या ६0 जागांवरच लक्ष

- कुंदन पाटीलअरूणाचल प्रदेशात लोकसभेच्या दोन जागांसह विधानसभेच्या ६0 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकांच्या आधी सहा जाती-जमातींना स्थायी रहिवास प्रमाणपत्र (पीआरसी) देण्याचा प्रयत्न भाजपाच्या अंगी आला आहे. या निर्णयाला विरोध करणाऱ्या जनतेला काँग्रेससहभाजपाविरोधी सर्वच घटक पक्षांनी पाठिंबा दिल्याने अरुणाचल विधानसभेच्या पटलावरच येण्यापूर्वीच ‘पीआरसी’च्या शिफारशी बासनात गेल्या. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा भाजपासाठी अडचणीचा ठरणार आहे.राज्यात लोकसभेच्या दोनच जागा आहेत. त्यामुळे स्थानिक जनता लोकसभेपेक्षा विधानसभेच्या ६0 जागांसाठी कसे मतदार करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आता तिथे भाजपाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखालील सरकार असले तरी २0१४ साली विधानसभेत काँग्रेसला ४२ जागांवर तर भाजपाला केवळ ११ जागांवरच यश मिळाले होते. काँग्रेसचे नबाम तुकी मुख्यमंत्री झाले. पण केंद्रातील सत्तेच्या आधारे भाजपाने येथील काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि कालिखो पूल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आमदार भाजपामध्ये आणले. कालिखो पूल फेब्रुवारी २0१६ मध्ये मुख्यमंत्री झाले. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे कालिखो पूल यांनी आॅगस्ट २0१६ मध्ये आत्महत्या केली. राज्यात २0१६ पासून पेमा खांडू मुख्यमंत्री आहेत आणि २0१४ साली ११ आमदार असलेल्या भाजपाकडे आज ४८ आमदार आहेत. त्यापैकी ३७ काँग्रेसमधून आलेले. त्यामुळे जनता आता भाजपाच्या हाती सत्ता देणार की पूर्वीप्रमाणे काँग्रेसला, हे पाहणे रंजक ठरेल.नामसाई व चांगलांग जिल्ह्यांतील ६ आदिवासी जाती-जमातींना स्थायी निवासी प्रमाणपत्र देण्याची तयारी सुरु केली. त्यासाठीच्या समितीने देवरीस, सोनोवाल, कछारी, मोरांस, आदिवासी आणि मिशींग या जमातींना ‘पीआरसी’ देण्यासंदर्भात अभ्यास सुरू केला. बिगर निवासी आणि बिगर आदिवासींना निवासी प्रमाणपत्र दिल्यास स्थानिक आदिवासींवर अन्याय होईल म्हणून जनतेत केंद्र व राज्य सरकारविरोधात जनता रस्त्यावर उतरली.काँग्रेस आणि पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचलला (पीपीए) मुख्यमंत्री पेमा खांडू आणि अरुणाचलमधून निवडून आलेले केंद्रीय मंत्री किरेन रिजुजू याना लक्ष्य करण्याची संधी मिळाली. तिकडे अरुणाचलच्या जनतेने आंदोलनाला हिंसक वळण दिले. गोळीबार झाला. त्यात तीन जण मरण पावले. तो राग आजही धुमसत आहे. संचारबंदी लागली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हिंसक आंदोलन झाले. उपमुख्यमंत्र्यांच्या घराला आग लावली. तेव्हा नमती भूमिका घेत राज्य सरकारने संयुक्त उच्चाधिकार समितीचा अहवाल पटलावर येण्यापूर्वीच विधानसभेचे कामकाज गुंडाळले. ‘पीआरसी’ देण्याचा विचार आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. ही समिती केवळ शिफारस करणार आहे, असे आता सरकार सांगत आहे.तिकडे २२ वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग यांनी भाजपाला रामराम केला आणि माजी पंतप्रधान एच.पी.देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरमध्ये (जेडीएस) प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत तेही भाजपाविरोधात मैदानात येणार आहे.वाढती गुन्हेगारी ही खांडूंची डोकेदुखीभाजपाने खांडूंचा चेहरा पुढे करीत निवडणुकींना सामोरे जाण्याचे ठरविले आहे. कोळसा घोटाळा, पत्रकारांवरील हल्ले, दरोडा, हत्यांसह जवळपास दीडशे महिलांवर अत्याचाराचा मुद्दा निवडणूक काळात तापणार आहे. सर्वच विरोधी पक्ष या मुद्यावरुन भाजपाला घेरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री खांडू यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.आयाराम-गयारामांची जत्रा भरणारअरुणाचलमध्ये लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीला महत्त्व दिले जात आहे. अरुणाचल प्रदेश पूर्वमध्ये काँग्रेसचे निनोग इरिंग तर पश्चिममध्ये भाजपाचे किरेन रिजूजू विद्यमान खासदार आहेत. दोघांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसला प्रत्येकी एक उमेदवाराचा शोध करावा लागत आहे. आगामी काळात आयाराम-गयारामांची जत्रा भरणार आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसल्यास भाजपाचा विजयाची वाट सुकर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा