प्रज्ञा - गावचा विकास अवघड नाही : सुरेश गोरे

By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30

चासकमान : लोकसहभागातून गावाला दिशा द्या, मागचे सगळे विसरा. जातिपातीचे राजकारण करू नका. ग्रामसभेच्या माध्यमातून गावच्या विकासाची दिशा ठरवा. गावात दारू बंद करा. शाळा व विजेची उपलब्धता करून गावातच युवकांना रोजगार उपलब्ध करा. गावात लहान मोठा कोणी नाही, सगळे समान असे ठरवल्यास गावचा विकास करणे काही अवघड नाही, असे प्रतिपादन सुरेश गोरे यांनी केले.

Pragya - Development of the village is not difficult: Suresh Gore | प्रज्ञा - गावचा विकास अवघड नाही : सुरेश गोरे

प्रज्ञा - गावचा विकास अवघड नाही : सुरेश गोरे

सकमान : लोकसहभागातून गावाला दिशा द्या, मागचे सगळे विसरा. जातिपातीचे राजकारण करू नका. ग्रामसभेच्या माध्यमातून गावच्या विकासाची दिशा ठरवा. गावात दारू बंद करा. शाळा व विजेची उपलब्धता करून गावातच युवकांना रोजगार उपलब्ध करा. गावात लहान मोठा कोणी नाही, सगळे समान असे ठरवल्यास गावचा विकास करणे काही अवघड नाही, असे प्रतिपादन सुरेश गोरे यांनी केले.
आदर्श गाव योजनेअंतर्गत साकुर्डी या गावास आमदार सुरेश गोरे यांनी दत्तक घेतले. त्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमास राजेंद्र गायकवाड, लक्ष्मण जाधव, प्रकाश वाडेकर, शंकर दाते, सरपंच कुंदा कडू, संदेश मुळुक, गुलाब कडू, चिमाजी लोहकरे, डॉ. बाळकृष्ण, मार्तंड कदम, चंद्रकांत कडलग, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. प्रवीण कदम यांनी सूत्रसंचालन केले.
फोटोओळ - साकुर्डी(ता.खेड) येथे आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गाव दत्तक घेण्याप्रसंगी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार सुरेश गोरे.

Web Title: Pragya - Development of the village is not difficult: Suresh Gore