शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! ५ दहशतवाद्यांना मारणाऱ्या भारतीय जवानाला हौतात्म्य; गर्भवती पत्नीची भावनिक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:56 IST

pradeep nain para commando : शहीद जवान प्रदीप नैन हे त्यांच्या बाळाचा चेहरा न पाहताच आपल्यातून निघून गेले.

Pradeep Nain Army : भारतमातेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या जवानाने अखेर अंतिम श्वास घेऊन या जगाचा निरोप घेतला. हरयाणातीलशहीद जवान प्रदीप नैन हे त्यांच्या बाळाचा चेहरा न पाहताच आपल्यातून निघून गेले. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला. २७ वर्षीय शहीद प्रदीप यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या गावात एकच खळबळ माजली. दोन दिवस गावातील एकाही घरात चूल पेटली नाही. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत प्रदीप नैन यांना वीरमरण आले आणि त्यांच्या आई वडिलांनी एकुलत्या एक मुलाला गमावले. प्रदीप यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी जिंद जिल्ह्यातील जजनवाला गावात स्थानिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.  प्रदीप नैन हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. या शहीद जवानाला सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. प्रदीप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लष्कराचे अधिकारी, माजी अधिकारी, सैनिक आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. घटनास्थळी आर्मी वेटरन असोसिएशनचे झोनल अध्यक्ष राजबीर सिंह म्हणाले की, शहीद होण्यापूर्वी प्रदीप यांनी पाच दहशतवाद्यांना मारले होते. 

तसेच पॅरा कमांडो लान्स नाईक प्रदीप नैन हे जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करत होते. गोळी लागल्याने प्रदीप यांना वीरमरण आले, असेही राजबीर सिंह यांनी सांगितले. आजूबाजूच्या गावातील लोक आणि सर्व गावकरी प्रदीप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. यावेळी स्थानिक प्रशासन घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, प्रदीप जैन यांची अंत्ययात्रा सुरू असताना त्यांची गर्भवती पत्नी मनीषा नैन पतीच्या अंत्ययात्रेत मागे चालत होती. पत्नी मनीषा नैन पायी चालत घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीच्या परिसरापर्यंत पोहोचली. शहीद पतीचा आत्मा दुखावेल म्हणूनच मी अश्रूंचा बांध रोखला असल्याचे मनीषा यांनी सांगितले. 

टॅग्स :HaryanaहरयाणाIndian Armyभारतीय जवानMartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला