नवी दिल्ली - सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोन, लॅपटॉपमध्ये अडकलेली आपली जीवनशैली आरोग्यासाठी घातक ठरत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आता ‘डिजिटल फास्टिंग’ हा प्रभावी उपाय म्हणून समोर येत आहे. उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होते, त्याचप्रमाणे ‘डिजिटल फास्टिंग’मुळे मेंदूला स्क्रीनच्या जाळ्यातून मुक्ती मिळते.
सुरुवात कशी करावी? कुटुंबाला पूर्वकल्पना द्या, फोन ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोडवर ठेवा आणि वाचनासाठी पुस्तके जवळ ठेवा. दररोज संध्या. ७ ते सकाळी ७, आठवड्यातून एक दिवस किंवा महिन्यातून २४ तास डिजिटल फास्टिंग करा.
याचे सात प्रमुख फायदेसततच्या नोटिफिकेशनपासून सुटका मिळाल्याने मेंदूला आराम मिळतो.स्क्रीन वेळेत बंद केल्याने मेलाटोनिन हार्मोन सामान्य राहते आणि चांगली झोप लागते.विचलित न होता वाचन, लेखन किंवा छंद जोपासणे शक्य होते.फोनशिवाय कुटुंबासोबत वेळ घालवल्याने संवाद अधिक सखोल होतो.चालणे, व्यायाम आणि निसर्गाशी जवळीक वाढते.कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. प्रगती तपासा मोबाइलमधील गेम्स, शॉपिंग ॲप्स डिलीट करा, नोटिफिकेशन टोन कायम बंद ठेवा. सोशल मीडिया ॲप्सचा पासवर्ड ओपन न ठेवता दरवेळी टाकण्याची सवय लावा.
‘डिजिटल फास्टिंग’ म्हणजे काय?स्मार्टफोन, कॉम्प्युटर, टीव्ही आणि सोशल मीडियापासून जाणीवपूर्वक ठरावीक काळ दूर राहणे म्हणजे ‘डिजिटल फास्टिंग’ होय. डिजिटल फास्टिंगचे मुख्य तीन प्रकार आहेत.
पूर्ण डिजिटल फास्टिंग : सर्व स्क्रीनपासून २४ तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ दूर राहणे, म्हणजेच पूर्ण ‘डिजिटल फास्टिंग’ होय.
आंशिक डिजिटल फास्टिंग : दिवसातील काही ठरावीक तास (उदा. रात्री ८ नंतर) किंवा आठवड्यातून एक दिवस स्क्रीन न वापरणे.
डिजिटल डिटॉक्स : केवळ सोशल मीडिया किंवा त्याचे नोटिफिकेशन बंद ठेवणे. यालाच ‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणतात.
डिजिटल फास्टिंग का गरजेचे आहे?भारतात सरासरी व्यक्ती रोज ७ ते ८ तास स्क्रीनवर घालवते. यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. । झोपेचे चक्र बिघडणे. । एकाग्रता कमी होणे. । चिंता आणि नैराश्य (डिप्रेशन) वाढणे. । डोळ्यांचा थकवा (डिजिटल आय स्ट्रेन). । कुटुंब आणि मित्रांपासून दुरावा निर्माण होणे.
Web Summary : Digital fasting, avoiding screens, combats lifestyle ailments. It enhances sleep, focus, relationships, and well-being. Start gradually with evening or day-long breaks. Delete distracting apps, mute notifications, and rediscover life beyond the screen.
Web Summary : डिजिटल फास्टिंग, स्क्रीन से दूरी, जीवनशैली की बीमारियों से लड़ता है। यह नींद, एकाग्रता, रिश्तों और कल्याण को बढ़ाता है। शाम या दिन भर के ब्रेक के साथ धीरे-धीरे शुरुआत करें। ध्यान भटकाने वाले ऐप्स हटाएं, नोटिफिकेशन म्यूट करें और स्क्रीन से परे जीवन को फिर से खोजें।