शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
4
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
5
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
6
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
7
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
8
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
9
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
10
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
11
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
12
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
13
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
14
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
15
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
16
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
17
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
18
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
19
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
20
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 09:50 IST

या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मोठा भाव मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

नवी दिल्ली - भारताला इंधन क्षेत्रात स्वावलंबी बनविण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या उत्सर्जन नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला असून, यामुळे देशात ८५% (ई८५) आणि १००% (ई१००) इथेनॉलमिश्रित इंधनावर चालणाऱ्या गाड्या धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मध्ये बदल सुचवणारी अधिसूचना मंत्रालयाने २७ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली आहे. सध्या पेट्रोलमध्ये १० ते २० टक्के इथेनॉल मिश्रण केले जाते. मात्र, नवीन प्रस्तावानुसार आता ई८५, ई१०० यांसारख्या उच्च इथेनॉल मिश्रणासह, शुद्ध बायोडिझेल (बी१००) आणि हायड्रोजन-सीएनजी इंधनालाही अधिकृत मान्यता दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांचे सोने होणारइथेनॉलची निर्मिती ऊस, मका आणि तांदूळ यांसारख्या पिकांपासून केली जाते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मोठा भाव मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च होणारे अब्जावधी डॉलर्स वाचण्यास मदत होणार आहे.३० दिवसांत सूचना मांडण्याचे आवाहनमंत्रालयाने या प्रस्तावांवर ३० दिवस सार्वजनिक सूचना कालावधी ठेवला आहे. नागरिक आणि वाहन उद्योगातील तज्ज्ञ आपल्या सूचना किंवा हरकती नोंदवू शकतात. 

हलकी व्यावसायिक वाहनेही येणार नव्या कक्षेतप्रस्तावित बदलांमध्ये हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी वजन मर्यादा ३,००० किलोवरून ३,५०० किलोपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्हॅन, पिकअप आणि लहान ट्रक एकसमान उत्सर्जन चाचणीच्या कक्षेत येणार आहेत. इंधनांच्या व्याख्या आणि मानके अद्ययावत करण्यात आल्या. ‘हायड्रोजन प्लस सीएन’ऐवजी ‘हायड्रोजन प्लस सीएनजी’ असा बदल करण्यात आला असून, उत्सर्जन मोजमाप ‘मिलीग्रॅम/किलोवॅटतास’ या स्वरूपात निश्चित करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India to Run Vehicles on 100% Ethanol; Emission Norms Proposed

Web Summary : India paves way for E85, E100 ethanol vehicles, benefiting farmers. Emission norms updated, including biodiesel and hydrogen-CNG. A 30-day public comment period is open.
टॅग्स :carकार