शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

‘जेईई अ‍ॅडव्हान्स’चा अभ्यासक्रम कमी करण्याची शक्यता; पुढील आठवड्यातील बैठकीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 23:28 IST

आयआयटी संस्थांत प्रवेश मिळण्यासाठी जेईई परीक्षा घेतली जाते. कोविड-१९ साथीमुळे ही परीक्षा कशी घ्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणू साथीमुळे सर्व शैक्षणिक घडामोडी बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर २0२0 च्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करण्याचा, तसेच परीक्षा पद्धती बदलण्याचा विचार सुरू असून, ‘इंडियन इन्स्टिट्यूटस् आॅफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) संस्था यावर चर्चा करणार आहेत.आयआयटी संस्थांत प्रवेश मिळण्यासाठी जेईई परीक्षा घेतली जाते. कोविड-१९ साथीमुळे ही परीक्षा कशी घ्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. आयआयटी संस्थांच्या ‘संयुक्त प्रवेश मंडळा’च्या (जेएबी) आढावा बैठकीत हा मुद्दा विचारार्थ येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील आठवड्यात ही बैठक होणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. इतरही काही मुद्दे बैठकीत चर्चिले जाणार आहेत.यंदाची जेईई अ‍ॅडव्हान्स आयआयटी-दिल्ली घेणार आहे. आयआयटी-दिल्लीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील आठवड्यात ‘जेएबी’ची आढावा बैठक होत आहे. या बैठकीत जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा होईल. परीक्षेची पद्धती, अभ्यासक्रम यासंदर्भातील प्रस्ताव बैठकीत चर्चिले जातील. ‘जेएबी’ने मंजुरी दिल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. जेईई परीक्षेला बसण्यासाठी उमेदवार शालेय बोर्डाची १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट यंदा शिथिल केली जाण्याचीही शक्यता आहे.कोविड-१९ साथीमुळे सीबीएसई आणि सीआयएससीई यासह देशभरातील विविध बोर्डांनी यंदा आपल्या परीक्षा रद्द केल्या आहेत.परीक्षा रद्द झाल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना गुण कसे द्यायचे यासंबंधी विविध बोर्डांकडून वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांवर विचार केला जात आहे. प्रत्येक बोर्डाचा फॉर्म्युला भिन्न असेल, तर विद्यार्थ्यांच्या गुणांत समानता असणार नाही. त्यामुळे जेईईसाठी ते कसे ग्राह्य धरायचे ही एक मोठीच समस्या बनणार आहे.एनटीएकडून अधिकृत दुजोरा नाही- स्थापित नियमानुसार, आयआयटी संस्थांत प्रवेशासाठी १२ वीच्या परीक्षेत किमान ७५ टक्के गुण अथवा टॉप २0 पर्सेंटाईल असणे आवश्यक आहे. सीबीएसईने आपल्या अभ्यासक्रमात ३0 टक्के कपात केली आहे. याचा नीट (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) आणि जेईई यांच्यावर गंभीर परिणाम होईल, असे मानले जात आहे. कारण प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम हा सीबीएसईच्या ११ वी व १२ वीच्या अभ्यासक्रमावरच आधारलेला असतो.- सूत्रांनी सांगितले की, ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’साठी अभ्यासक्रम कमी केल्यास ‘जेईई मेन’चा अभ्यासक्रमही कमी होईल. शाळा योग्य वेळेत उघडल्या गेल्या नाहीत, तर जानेवारी २0२१ मधील जेईई मेन परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. परीक्षा घेणाºया ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’कडून (एनटीए) मात्र या वृत्तास कोणत्याही प्रकारे दुजोरा मिळू शकलेला नाही.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा