शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील प्रदूषण; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी केजरीवाल रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 12:41 IST

दिल्लीमधील प्रदूषण आणि धुरक्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज चंदिगढ येथे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना भेटत आहेत.

ठळक मुद्देदिल्ली राजधानी क्षेत्र हे राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांनी वेढलेले आहे. या राज्यांमध्ये नवे पीक घेण्यासाठी शेतजमिनीवरच आधीच्या पिकाचे पाचट आणि इतर तण जाळले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो आणि परिणामी सर्वच क्षेत्राची हवा प्रदुषित

नवी दिल्ली- गेल्या आठवड्यापासून राजधानी दिल्लीमध्ये असणाऱ्या प्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेत पडले आहेत. दिल्ली आणि परिसरामध्ये सकाळपासूनच धुरके तयार झाल्यामुळे दृश्यताही कमी झाली आहे. प्रदुषणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे निश्चित केले होते मात्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केजरीवाल आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना भेटण्यासाठी चंदिगढला जाऊन पोहोचले आहेत.अरविंद केजरीवाल यांच्यावर अमरिंदर सिंग यांनी काल सडकून टीका केली होती. ''अशा प्रकारच्या कोणत्याही चर्चेमधून काहीही मिळणार नाही. प्रत्येक मुद्दयाचे राजकारण करण्याची केजरीवाल यांची सवय सर्वांनाच माहिती आहे. दिल्लीमधील प्रदुषणामागे शहरातील प्रदुषके आणि बांधकामे कारणीभूत आहेत असे सांगून कोणत्याही प्रकारची बैठक घेण्याचा प्रश्नच येत नाही'' अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांच्या बैठकीच्या मागणीला सिंग यांनी धुडकावून लावले. आपली मागणी सिंग यांनी फेटाळल्यानंतरही केजरीवाल यांनी काल, "मी उद्या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत आहे, तुम्हीही भेटलात तर फार बरे होईल, हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे" असे ट्वीट केले होते.

दिल्ली राजधानी क्षेत्र हे राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांनी वेढलेले आहे. या राज्यांमध्ये नवे पीक घेण्यासाठी शेतजमिनीवरच आधीच्या पिकाचे पाचट आणि इतर तण जाळले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो आणि परिणामी सर्वच क्षेत्राची हवा प्रदुषित होते. मागील वर्षी दिल्ली हायकोर्टाने या राज्यांना ही शेतजमिनीवर गवत, पाचट जाळण्याची पद्धती बंद करावी अशा अत्यंत कडक शब्दांमध्ये सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन न झाल्यास संबंधित राज्याच्या मुख्य सचिवाला जबाबदार धरू असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आर्द्रता आणि धूर एकत्रित होऊन धुरके तयार होत असल्याचे दिसून येते. गेल्या सोमवारपासून दिल्लीच्या हवेच्या गुणवत्ता अत्यंत खालावल्याचे दिसून येते. त्यामुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे गॅस चेंबर झाले आहे असे विधान केले होते.

टॅग्स :Indiaभारत