शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

यूपीमध्ये राजकीय यात्रांची जोरदार धूम

By admin | Updated: September 11, 2016 07:03 IST

उत्तर प्रदेशच्या निवडणूक रिंगणात राजकीय यात्रांची धूम सुरू झाली आहे. भाजपची तिरंगा यात्रा व काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या किसान यात्रेनंतर आता सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव

मीना कमल,  लखनौ उत्तर प्रदेशच्या निवडणूक रिंगणात राजकीय यात्रांची धूम सुरू झाली आहे. भाजपची तिरंगा यात्रा व काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या किसान यात्रेनंतर आता सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी संदेश यात्रेद्वारे काँग्रेस व भाजपच्या यात्रांना प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांत यात्रा काढण्याची चढाओढ लागल्यामुळे उत्तरप्रदेश ढवळून निघाला असून राज्यात निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. मुलायमसिंह यांची संदेश यात्रा शनिवारी सुरू झाली. चार टप्प्यांत होणाऱ्या या यात्रेत मुलायमसिंह सरकारने केलेली विकास कामे जनतेसमोर ठेवतील. पहिल्या टप्प्यात ही यात्रा राज्याच्या विविध जिल्ह्यांत फिरून २० सप्टेंबरला राजधानी लखनौला परतेल. याच पद्धतीने आॅक्टोबरमध्ये दुसरा टप्पा, नोव्हेंबरमध्ये तिसरा टप्पा व डिसेंबरमध्ये या यात्रेचा चौथा टप्पा पार पडेल. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीही स्वतंत्र यात्रा प्रस्तावित आहे. भाजप आणि काँग्रेसने सर्वप्रथम यात्रा काढून आघाडी घेतली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची किसान यात्रा सुरू आहे. देवरिया येथून निघालेली २१ दिवसांची ही यात्रा संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे. सध्या या यात्रेचा उत्तरप्रदेशात पाचवा दिवस आहे. गेल्या महिन्यात भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत मोहनलालगंज येथून तिरंगा यात्रा काढली. पंधरा-पंधरा दिवसांचे टप्पे असलेली ही यात्रा राष्ट्रभक्तीबाबत जागृति घडवून आणण्यासाठी काढल्याचे सांगितले जात असले तरी या यात्रेमागेही उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूकच आहे.नितीश कुमार, अजितसिंह यांचीही तयारीबिहारचे मुख्यमंत्री आणि जदयु नेते नितीशकुमार, राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजितसिंग हेही यात्रेच्या तयारीत आहेत. काँग्रेस आणि सपाच्या यात्रा संपल्यानंतर त्यांच्या यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. बसपाने मात्र यात्रांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, बसपाप्रमुख मायावती यांनी आपल्या निवडणूक प्रचार फेऱ्या सुरू केल्या आहेत.