शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरप्रश्नी तोडग्यासाठी राजकीय पक्षांनी एक व्हावे

By admin | Updated: August 23, 2016 05:08 IST

जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तीव्र काळजी व दु:ख’ व्यक्त करून तेथील लोकांच्या जवळ जायचा प्रयत्न केला

हरिश गुप्ता,

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तीव्र काळजी व दु:ख’ व्यक्त करून तेथील लोकांच्या जवळ जायचा प्रयत्न केला. काश्मीर प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सगळ््या राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. गेल्या ४५ दिवसांपासून खोऱ्यात निर्माण झालेली अशांतता संपून सर्वसामान्य परिस्थिती निर्माण व्हावी, असे आवाहनही मोदी यांनी केले. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त विरोधी पक्षीय शिष्टमंडळाने मोदी यांच्याशी सोमवारी सकाळी सव्वा तास चर्चा केली. त्यानंतर प्रसिद्धीस देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘‘२० जणांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने या चर्चेमध्ये केलेल्या विधायक सूचनांचे मोदी यांनी स्वागत केले व खोऱ्यातील लोकांच्या कल्याणाला सरकार बांधील असल्याचा पुनरुच्चार केला.’’ शिष्टमंडळात नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जी. ए. मिर यांच्या नेतृत्वाखालील आमदार आणि माकपचे आमदार एम. वाय तरिगामी यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने मोदी यांच्या आधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांचीही भेट घेतली. ओमर अब्दुल्ला यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले की मोदी यांनी केलेल्या निवेदनाचे आम्ही स्वागत करतो. खोऱ्यातील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येऊन काम करता येईल. आतापर्यंत काश्मीरमधील हिंसाचारात ६७ जण ठार झाले आहेत. >सरकार पाठिशीखोऱ्यातील सध्याच्या अशांतेत ज्यांना जीव गमवावे लागले ते आमचे, आमच्या देशाचे होते. मग ते युवक असतील वा सुरक्षा कर्मचारी किंवा पोलीस. हे सगळेच दु:खदायक आहे. सरकार आणि देश जम्मू आणि काश्मीरच्या पाठिशी आहे. सगळ््या राजकीय पक्षांनी लोकांमध्ये जाऊन त्यांना हा संदेश सांगावा.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान