'लाठीचार्जचं तालिबानी फर्मान सोडणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांना बडतर्फ करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 03:35 PM2021-08-29T15:35:34+5:302021-08-29T15:36:50+5:30

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले. नंतर शेतकऱ्यांनी तत्काळ हिसार-दिल्ली मार्गावरील टोलनाक्यावर ठिय्या मांडला

'Police officer and SDM who released Taliban order should be fired', rakesh tikaitt | 'लाठीचार्जचं तालिबानी फर्मान सोडणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांना बडतर्फ करा'

'लाठीचार्जचं तालिबानी फर्मान सोडणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांना बडतर्फ करा'

googlenewsNext
ठळक मुद्देया घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. तालिबानी फर्मान देणाऱ्या करनालच्या एसडीएम यांचा तात्काळ हटविण्यात यावं, अशी मागणी टीकैत यांनी केली आहे.

चंदीगढ : हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा मतदारसंघ कर्नालमध्ये बसताडा टोलनाक्यावर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. यात भाजपच्या नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटली आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी ठिय्या मांडून रस्ते रोखून धरले तर विरोधी पक्षांची सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता, याप्रकरणी हरयाणातील संबंधित एसडीएमचे निलंबन करण्याची मागणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. 

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले. नंतर शेतकऱ्यांनी तत्काळ हिसार-दिल्ली मार्गावरील टोलनाक्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला, टोल नाक्यांवरही ठिय्या केला. त्यामुळे, पोलिसांनी शेतकऱ्यांवर निर्दयी लाठीचार्ज केला. त्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. 

या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. तालिबानी फर्मान देणाऱ्या करनालच्या एसडीएम यांचा तात्काळ हटविण्यात यावं, अशी मागणी टीकैत यांनी केली आहे. तसेच, करनालच्या डीएमला सस्पेंड करण्याची मागणी करणारा ट्विटर ट्रेंड करत आहे. 

म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला - यादव 

करनालचे उपजिल्हाधिकारी निशांत यादव म्हणाले की, सुरुवातीला शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऐकण्यास नकार दिल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीमार केला. यात काही शेतकरी तसेच पोलिसांनाही इजा झाली आहे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करनालमध्ये होणार असलेल्या भाजपच्या बैठकीला विरोध करण्याचा इशारा आधीच दिला होता. हे लक्षात घेता करनालमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. कारवाईच्या निषेधार्थ भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले.

चौकशीची मागणी 

काँग्रेस नेते राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी तसेच राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवावला यांनीहा या लाठीचार्जबाबत सरकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनीही लाठीमारीचा निंदा केली आहे. ते म्हणाले की, सरकार लाठ्या व बंदुकीच्या सहाय्याने नाही तर परस्पर सहमतीने चालवले पाहिजे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड़ म्हणाले की, पोलिसांनी कोणत्या परिस्थितील लाठीचार्ज केला याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे.

Web Title: 'Police officer and SDM who released Taliban order should be fired', rakesh tikaitt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.