पोलिसाच्या श्रीमुखात लगावली ! बाळेतील प्रकार : दारू ढोसलेल्या रिक्षाचालकावर गुन्हा

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:40+5:302015-07-10T23:13:40+5:30

सोलापूर : संशय आला म्हणून रिक्षा थांबवून चौकशी करणार्‍या फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यास नीट उत्तर न देता उलट त्याच्याच श्रीमुखात लगावल्याचा प्रकार बाळे क्रॉस रोडवर आज (शुक्रवारी) दुपारी १ वाजता घडला. आप्पाराव शाहूराव घोळवे असे जखमी पोलिसाचे नाव आहे.

Police headlined! Types of children: Crime against a liquor-rickshaw driver | पोलिसाच्या श्रीमुखात लगावली ! बाळेतील प्रकार : दारू ढोसलेल्या रिक्षाचालकावर गुन्हा

पोलिसाच्या श्रीमुखात लगावली ! बाळेतील प्रकार : दारू ढोसलेल्या रिक्षाचालकावर गुन्हा

लापूर : संशय आला म्हणून रिक्षा थांबवून चौकशी करणार्‍या फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यास नीट उत्तर न देता उलट त्याच्याच श्रीमुखात लगावल्याचा प्रकार बाळे क्रॉस रोडवर आज (शुक्रवारी) दुपारी १ वाजता घडला. आप्पाराव शाहूराव घोळवे असे जखमी पोलिसाचे नाव आहे.
घोळवे हे बाळे क्रॉस रोडवर आपली ड्यूटी बजावत होते. त्याचवेळी सचिन शिवाजी शिर्के (वय ३७, रा. राजस्वनगर, बाळे, सोलापूर) हा एमएच-१३/बीव्ही ०२३५ ही रिक्षा घेऊन निघाला होता. रिक्षातील लहान मुले कोणाची आहेत? कुठे चाललास ? असा प्रश्न करताच सचिन शिर्के यांनी नीट उत्तर न देता घोळवे यांची गच्ची पकडून त्यांच्या श्रीमुखात लगावली. पुढे त्याला ताब्यात घेत असतानाही त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मद्यपान करून मारहाण केली आणि शासकीय कामात अडथळा आणला म्हणून घोळवे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. सचिन शिर्केवर गुन्हा दाखल झाला असून, तपास सपोनि साळुंखे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Police headlined! Types of children: Crime against a liquor-rickshaw driver