शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

PM Narendra Modi : कामगारांनी स्थलांतर करू नये, शेतकरी अन् कामगारांचं होईल लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 9:09 PM

PM Narendra Modi :कोरोनाविरुद्ध देश पुन्हा एकदा मोठी लढाई लढत आहे. दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांना होत असलेले दुःख मला समजू शकते. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

ठळक मुद्देकोरोनाविरुद्ध देश पुन्हा एकदा मोठी लढाई लढत आहे. दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांना होत असलेले दुःख मला समजू शकते. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. यात सर्व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सहभागी झाले होते. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधत कोरोनाच्या परिस्थितीचं कथन केलं. 

कोरोनाविरोधातील लढाईत पुढील तीन आठवडे अत्यंत निर्णायक असतील, तसेच यादरम्यान प्रत्येकालाच अत्यंत सावध रहावे लागेल, असे केंद्रीय पथकाचे डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे. (The next three weeks are crucial, all states should be vigilant says Central Government government ). तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या भाषणात कोरोनाबद्दलची परिस्थिती सांगत देशाने जगभरातील लसीकरणामध्ये स्वत:ला सिद्ध केल्यचाचं मोदींनी सांगितलं. 

कोरोनाविरुद्ध देश पुन्हा एकदा मोठी लढाई लढत आहे. दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांना होत असलेले दुःख मला समजू शकते. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. कितीही कठीण परिस्थिती आली, तरी धैर्य, संयम गमावता कामा नये, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केलंय. तसेच, देशातील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्बुलन्स चालक, पोलीस कर्मचारी या कोरोना योद्धांचे कौतुक केले. तसेच, कोरोनाच्या लढाईला धैर्याने तोंड दिले, तरच आपण त्यात विजय मिळवू शकतो, असेही मोदी म्हणाले. 

देशातील प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा, लसीकरणासाठीही आपण महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता 1 मे पासून 18 वर्षांपासूनच्या सर्व नागरिकांना लस टोचण्यात येणार आहे. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असून आपल्याला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. त्यामुळे, शेतकरी आणि कामगार वर्गाला लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. म्हणून, कामगारांनी आहे त्याच जागी राहावे, स्थलांतर करू नये, असे आवाहनही मोदींनी आपल्या भाषणात केलंय. 

राज्य सरकारला माझा आग्रह आहे की, कामगारांना विश्वासात घ्यायला हवा. कामगार सध्या ज्या शहरात आहेत, तेथेच राहावे, असे सांगण्यात यावे. कामगार आणि शेतकऱ्यांचं प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या, आपण कोरोना महामारीला लढा देतोय, पहिल्या लाटेवेळी आपल्याकडं अनेक साधनसामुग्रींचा अभाव होता. आता, परिस्थिती वेगळी आहे. जनतेच्या सहभागातूनच आपण कोरोनाला पराभूत करू शकतो, असे मोदींनी म्हटले. 

लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी बैठक देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच, आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी बैठक घेतली. यापूर्वी सोमवारी त्यांनी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील प्रमुखांशी चर्चा केली होती. तसेच, पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत औषध क्षेत्राच्या महत्वपूर्ण भूमिकेचेही कौतुकही केले.

भारत बनला फार्मेसी ऑफ वर्ल्ड - मोदीमोदी म्हणाले, औषध उद्योगाच्या प्रयत्नांमुळेच, आज भारताला जगात फार्मेसी ऑफ वर्ल्ड म्हणून ओळखले जाते. आपण या महामारीच्या काळात जगातील 150 हून अधिक देशांना आवश्यक औषधी उपलब्ध करून दिली. 

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण -गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसChief Ministerमुख्यमंत्रीLabourकामगार