शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 14:18 IST

लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी भविष्यवाणी केले आहे...

लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी भविष्यवाणी केले आहे. "यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी सर्वोत्तम ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका एकतर्फी आहेत. त्यांचे नेतृत्व जनता जनार्दन करत आहे. यामुळे सरकारमध्ये बसलेले टीएमसीचे लोक गडबडले आहेत," असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

मोदी म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हत्या होत आहेत. हल्ले होत आहेत. मतदानापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. एवढे अत्याचार होऊनही लोक अधिकाधिक मतदान करत आहेत. टीएमसी बंगालच्या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे तीन लोक होते आणि बंगालच्या लोकांनी आम्हाला 80 वर नेले. गेल्या वेळीही लोकसभा निवडणुकीत आपल्याला प्रचंड बहुमत मिळाले होते. यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळेल."

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत येथे भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, त्यावेळी डाव्यांचा पार सुपडा-साफ झाला होता. गेल्या निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, उत्तर प्रदेशत भाजपला मोठा फायदा झाला होता. येथे भाजपने एकूण 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय, भाजपचा मित्रपक्ष अपना दलने दोन जागा जिंकल्या होत्या, बसपाला 10, सपाला पाच तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती. ओडिशावरही केलं भाष्य -यावेळी, ओडिशा आणि नवीन पटनायक यांच्यासंदर्भात विचारले असता, मोदी म्हणाले, 'भारतातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत आणि आम्ही लोकशाहीत वैर ठेवत नाही. आता प्रश्न आहे की, मी माझ्या संबंधांची काळजी करावी की ओडिशाच्या कल्याणाची? मी ओडिशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी मला माझ्या नात्यांचा त्याग करावा लागला तरी मी करेन. निवडणुकीनंतर मी सर्वांना समजावून सांगेन की, माझे कुणाशीही वैर नाही."

समृद्ध राज्यातील गरीब लोक पाहून वाईट वाटते -मोदी म्हणाले, "ओडिशाकडे प्रचंड नैसर्गिक संसाधने आहेत. एका समृद्ध राज्यातील गरीब लोक पाहून वाईट वाटते. भारतातील समृद्ध राज्यांत ओडिशा आहे. एवढी नैसर्गिक संसाधने आहेत. तसेच, देशातील गरीब लोकांच्या राज्यातही ओडिशा आहे. याला सरकार जबाबदार आहे. यामुळ ओडिशातील लोकांना त्यांचा अधिकार मिळायला हवा. ओडिशाचे भाग्य बदलणार आहे. सरकार बदलत आहे. मी म्हटले आहे की, ओडिशातील सरकारची एक्सपायरी डेट 4 जून आहे आणि 10 जूनला भाजपचा मुख्यमंत्री ओडिशात मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल." 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस