"मोदी चक्रवर्ती सम्राट, राजर्षी; 1000 वर्षात एकमेव हिंदू शासक! आमचं प्रेम भाजप नाही, तर PM अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 14:12 IST2024-02-05T14:11:30+5:302024-02-05T14:12:50+5:30
जितेंद्रानंदजी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना चक्रवर्ती सम्राट म्हटले आहे. तसेच त्यांना राजर्षी, अशी उपाधीही दिली आहे. एवढेच नाही, तर...

"मोदी चक्रवर्ती सम्राट, राजर्षी; 1000 वर्षात एकमेव हिंदू शासक! आमचं प्रेम भाजप नाही, तर PM अन्..."
अहमदाबादमध्ये संत मंडळींच्या एका सन्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जबरदस्त कौतुक करण्यात आले. पंतप्रधान नरेद्र मोदी हे गेल्या 1000 वर्षांतील एकमेव हिंदू शासक आणि चक्रवर्ती सम्राट आहेत. तसेच, आमचे प्रेम भाजपसाठी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी आहे, असे अखिल भारतीय संत समितीचे महासचिव जितेंद्रानंदजी यांनी म्हटले आहे.
जितेंद्रानंदजी म्हणाले, 'आम्ही मोदी आणि अमित शाह यांच्यावर प्रेम करतो, भाजपवर नाही. दुविधेत राहू नका. कारण भाजपमध्ये बरेच नास्तिकही आहेत, ज्यांचे धर्माशी काही घेणे-देणे नाही. आम्ही मोदी आणि शाहंवर प्रेम करतो. कारण गेल्या 1000 वर्षांत केवळ मोदीच एकमेव हिंदू शासक आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.'
जितेंद्रानंदजी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना चक्रवर्ती सम्राट म्हटले आहे. तसेच त्यांना राजर्षी, अशी उपाधीही दिली आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राजर्षि होण्याचे सर्व गूण विद्यमान आहेत. राजर्षी अशा राजाला म्हटले जाते, जो विद्वानही आहे.
रामजन्मभूमी न्यासला IT डिपार्टमेन्टनं 22 नोटिस दिल्या, छापेमारी केली पण... -
काँग्रेसकडून सरकारवर तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप केला जातो, यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, 'रामजन्मभूमी न्यासला टार्गेट करत इन्कम टॅक्स डिपार्टमेन्ट कडून 22 नोटिस देण्यात आल्या आणि छापेमारी करण्यात आली. मात्र चंपतराय जींनी यासंदर्भात कधी रडारड केली नाही. जसे, सध्या काँग्रेस करत आहे.'
ज्ञानवापीमध्ये पूजेसाठी न्यायालयाने दिलेल्या परवानगी संदर्भात बोलताना ते म्हणाले, 'आम्ही अयोध्या, काशी आणि मथुरेसाठी शपथ घेतली आहे. अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनंतर, आता काशीचे ताळेही तुटले आहेत.'