शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

"जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना...!", सरदार पटेलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा प्रहार; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:29 IST

मोदी पुढे म्हणाले, "१९४७ मध्ये भारत मातेचे तुकडे झाले. खरे तर साखळदंड तुटायला हवे होते. मात्र, हात कापले गेले. देशाचे तीन तुकडे झाले आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला...

दहशतवाद ही पाकिस्तानची सुनियोजित युद्धनीती आहे. १९४७ मध्ये भारत मातेचे तुकडे झाले. खरे तर साखळदंड तुटायला हवे होते. मात्र, हात कापले गेले. देशाचे तीन तुकडे करण्यात आले आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मदतीने मुजाहिदीनांच्या नावाखाली भारत मातेच्या एक भू-भागावर कब्जा केला. जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना कंठस्नान घातले असते... ते मुजाहिदीन, जे रक्त चाटून गेले होते, ती मालिका गेल्या ७५ वर्षांपासून सुरू आहे. पहलगामध्येही त्याचेच विकृत रूप होते. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी गांधीनगर येथे जनतेला संबोधित करत होते.मोदी पुढे म्हणाले, "सरदार पटेलांची इच्छा होती, जोवर पीओके परत येत नाही, तोवर आपले सैन्य थांबायला नको. मात्र, सरदार पटेलांचे म्हणणे ऐकले गेले नाही आणि ते मुजाहिदीन, जे रक्त चाटून गेले होते, ती मालिका गेल्या ७५ वर्षांपासून सुरू आहे. पहलगामध्येही त्याचेच विकृत रूप होते. ७५ वर्षे आपण सोसले आहे आणि पाकिस्तान सोबत जेव्हा जेव्हा यद्धाची वेळ आली, तिनही वेळा भारताच्या सैन्य शक्तीने पाकिस्तानला धूळ चारली आणि पाकिस्तानला समजले की ते लढाईत भारतासोबत जिंकू शकत नाही. सैन्य प्रशिक्षित दहशतवादी भारतात पाठवले जातात आणि निर्दोश निशस्त्र लोक मारले जातात आणि आपण सहण करत राहिलो." 

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “६ मेच्या रात्री पाकिस्तानात जे मारले गेले, त्यांना स्टेट ऑनर देण्यात आला. त्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानी झेंडे लावण्यात आले आणि तेथील सैन्याने त्यांना सलामीही दिली. यावरून स्पष्ट होते की, दहशतवादी कारवाया हे प्रॉक्सी वॉर नाही, तर तुमची (पाकिस्तानची) सुनियोजित युद्धनीती आहे. जर तुम्ही युद्ध करत असाल, तर तुम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर मिळेल."  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPakistanपाकिस्तानcongressकाँग्रेसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला