PM Modi Letter to India: दीपावलीच्या शुभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना उद्देशून एक विशेष पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीनंतरची दुसरी दीपावली, भारतीय सेनेच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेचा उल्लेख आणि देशातील नक्षलवादाच्या समाप्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
पीएम मोदी म्हणाले, “ऊर्जा आणि उत्साहाने भरलेल्या या पवित्र दीपोत्सवानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अयोध्येत श्रीराम मंदिर बांधल्यानंतर ही दुसरी दीपावली आहे. भगवान राम आपल्याला धर्माचे पालन आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देतात. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येभारताने धर्माचं पालन करत अन्यायाचा बदला घेतला.”
“ही दीपावली विशेष आहे, कारण देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः ज्या भागांत पूर्वी नक्षलवाद आणि माओवादी हिंसा होती, तिथे प्रथमच दीप लावले जात आहेत. अनेक लोक हिंसेचा मार्ग सोडून संविधानावर विश्वास ठेवत विकासाच्या प्रवाहात सहभागी होत आहेत.”
यासोबतच पंतप्रधानांनी आपल्या पत्रात आर्थिक सुधारणा, जीएसटी दरांमध्ये झालेली घट, आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी उत्पादनांना मिळत असलेलं प्रोत्साहन यांचाही उल्लेख केला. मोदींचं हे पत्र दीपावलीच्या शुभेच्छांसह देशातील सांस्कृतिक अभिमान, सुरक्षा आणि विकास यांचं प्रतीक म्हणून पाहिलं जात आहे.
Web Summary : PM Modi's Diwali letter highlights Ram Temple's significance, Operation Sindoor's justice, and Naxalism's decline. He also mentions economic reforms and self-reliance.
Web Summary : पीएम मोदी के दिवाली पत्र में राम मंदिर का महत्व, ऑपरेशन सिंदूर का न्याय और नक्सलवाद में गिरावट पर प्रकाश डाला गया है। उन्होंने आर्थिक सुधारों और आत्मनिर्भरता का भी उल्लेख किया।