पीएम मोदी घाबरले..; राहुल गांधींची टीका, LPG च्या मुद्द्यावरून विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:31 IST2026-03-12T13:28:50+5:302026-03-12T13:31:21+5:30
LPG Protest: LPG च्या मुद्द्यावरून विरोधकांची संसद परिसरात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी!

पीएम मोदी घाबरले..; राहुल गांधींची टीका, LPG च्या मुद्द्यावरून विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
LPG Protest: इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागांत एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्यांमुळे संसदेत गुरुवारी मोठा गोंधळ झाला. या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला जबाबदार धरत चर्चा करण्याची मागणी केली. घोषणाबाजी आणि गोंधळ वाढल्याने संसद अधिवेशन काही काळासाठी स्थगित करावे लागले. यादरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
#WATCH | Delhi | Lok Sabha LoP Rahul Gandhi joins Opposition leaders staging a protest in the Parliament premises over the reports of nationwide shortage of LPG gas cylinders. pic.twitter.com/FrxfhIJyiN
— ANI (@ANI) March 12, 2026
अनेक भागांत सिलेंडरसाठी लांब रांगा
मिडल ईस्टमधील तणावामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. देशातील काही भागांत एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर सिलेंडर वितरण केंद्रांवर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संसदेत हा मुद्दा उचलत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
#WATCH | LoP Lok Sabha, Rahul Gandhi says," The PM is saying that there is no need to panic. But the PM himself is panicked for completely different reasons. He is panicked because of the Adani case, Epstein. He is not able to come inside the House. He is telling the country not… pic.twitter.com/T0mbMpueFN
— ANI (@ANI) March 12, 2026
पंतप्रधान स्वतः घाबरलेले- राहुल गांधी
या विषयावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान म्हणतात की, घाबरण्याची गरज नाही. मात्र ते स्वतः वेगळ्या कारणांमुळे घाबरलेले आहेत. अदानी प्रकरण आणि एपस्टीन प्रकरणामुळे ते घाबरले आहेत. त्यामुळे ते सभागृहात येत नाहीत. काल संसदेत पंतप्रधानांची खुर्ची रिकामी होती.
#WATCH | Delhi | On reports of LPG shortage, Congress MP Shashi Tharoor says, "Such issues should be discussed in Parliament. The government should be informed. You know how long the lines are for LPG cylinders... You know that prices have been increased. This is a platform to… pic.twitter.com/NUANb0wbMn
— ANI (@ANI) March 12, 2026
संसदेत चर्चेची मागणी - शशी थरूर
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी एलपीजी तुटवड्याच्या मुद्द्यावर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, अनेक ठिकाणी लोकांना सिलेंडरसाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे सरकारने संसदेत येऊन परिस्थितीबाबत स्पष्ट माहिती द्यावी आणि नागरिकांना विश्वास द्यावा.