शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन आयोगात सुंदोपसुंदी

By admin | Updated: August 4, 2014 02:35 IST

केंद्रीय नियोजन राज्यमंत्री राव इंदरजित सिंग आणि स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाचे महासंचालक अजय छिब्बर यांच्यात चांगलीच जुंपली

हरीश गुप्ता, नवी दिल्लीकेंद्रीय नियोजन राज्यमंत्री राव इंदरजित सिंग आणि स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाचे महासंचालक अजय छिब्बर यांच्यात चांगलीच जुंपली असून राव यांनी स्वतंत्र मूल्यांकन कार्यालय बंद करून छिब्बर यांना या पदावरून हटविण्याची शिफारस थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. यावर नेपाळ दौऱ्यावरून परतल्यानंतरच मोदी निर्णय घेतील. तथापि, सूत्रांनुसार हे कार्यालय गुंडाळून छिब्बर यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाणार असल्याचे कळते.२०१० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाचे (आयईओ) महासंचालक अजय छिब्बर यांनाही राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. त्यांनीच नियोजन आयोग गुंडाळण्याची शिफारस केली होती, तेव्हापासून नियोजन आयोगावरून या दोघांत जुंपली आहे.नियोजन आयोग गुंडाळण्याची शिफारस संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या राजवटीतच करण्यात आली होती. असे असले तरी मॉन्टेकसिंंह अहलुवालिया आणि इतर सदस्यांनी २६ मे २०१४ रोजी राजीनामे दिल्यानंतरही मोदी यांनी नियोजन आयोगाची फेररचना केलेली नाही.स्वतंत्र मूल्यांकन कार्यालय नियोजन आयोगाच्या अंतर्गत येते. नियोजन आयोगाच्या मंजुरीतहत सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमांची बारकाईने तपासणी करण्याचे काम स्हे कार्यालय करते.राव यांचे असे म्हणणे आहे की, स्वतंत्र मूल्यांकन कार्यालय म्हणजे वायफळ खर्च होय. कारण नियोजन आयोगाकडे असाच एक विभाग असल्याने या कार्यालयाकडून याच कामाची नक्कल केली जाते. नियोजन आयोगाकडील मूल्यांकन विभागाने ४६ अहवाल सादर केलेले आहेत, तर दुसरीकडे स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाने आजवर फक्त तीनच अहवाल दिले आहेत; परंतु तेही काही उपयोगाचे नाहीत.राव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपरोक्त शिफारस केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तथापि, अधिक तपशील देण्याचे टाळले. नियोजन आयोगाचे स्वरूप आणि कार्यपद्धती निव्वळ अडथळा असून त्यापासून भारताच्या विकासाला काडीचीही मदत होत नाही, असे स्पष्ट करीत छिब्बर यांनी नियोजन आयोगाऐवजी एक थिंक टँक स्थापन करण्याची शिफारस केली आहे.